Friday, April 24, 2026
Homeमहाराष्ट्रST Bus Brand Ambassador : 'लालपरी'ला मिळणार नवं ग्लॅमर! आता रितेश-जिनिलिया देणार...

ST Bus Brand Ambassador : ‘लालपरी’ला मिळणार नवं ग्लॅमर! आता रितेश-जिनिलिया देणार एसटीला साथ; महामंडळाचा मोठा निर्णय

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आणि सर्वसामान्यांच्या हक्काचे साधन असलेली ‘लालपरी’ आता एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा अधिक आधुनिक, गतिमान आणि आकर्षक करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मराठी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रितेश आणि जिनिलिया देशमुख आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (MSRTC) नवा चेहरा असणार आहेत.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांत खाजगी ट्रॅव्हल्सच्या वाढत्या स्पर्धेमुळे एसटीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः तरुण पिढीला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळवण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. रितेश आणि जिनिलिया यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि त्यांचा सर्वसामान्य जनतेशी असलेला कनेक्ट लक्षात घेता, त्यांची ब्रँड ॲम्बेसडर म्हणून निवड करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या नियुक्तीसाठी विशेष पुढाकार घेतला असून, या जोडीसोबत पुढील ५ वर्षांसाठी अधिकृत करार करण्यात येणार आहे.

केवळ जाहिरातींपुरते मर्यादित न राहता, रितेश आणि जिनिलिया आगामी काळात महामंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘रस्ता सुरक्षा अभियान’, प्रवाशांची सुरक्षा, आणि महिला प्रवाशांसाठीच्या विशेष योजनांचा समावेश असेल. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांमध्ये नियमांची जाणीव करून देण्यासाठी ही जोडी जनजागृती मोहिमेचे नेतृत्व करताना दिसेल.

एसटी महामंडळाचा इतिहास अत्यंत गौरवशाली राहिला आहे. यापूर्वी दिग्गज अभिनेते मकरंद अनासपुरे आणि दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांनी एसटीचे ब्रँड ॲम्बेसडर म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात एसटीची प्रतिमा उंचावण्यास मोठी मदत झाली होती. आता रितेश-जिनिलिया यांच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही स्तरांवरील प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा महामंडळाचा मानस आहे.

योगायोगाने, रितेश आणि जिनिलिया सध्या त्यांच्या ‘राजा शिवाजी’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. या चित्रपटात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, तर जिनिलिया महाराणी सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता, या जोडीची लोकप्रियता सध्या शिखरावर आहे. याच लोकप्रियतेचा फायदा एसटीला पुन्हा एकदा ‘नंबर १’ बनवण्यासाठी होणार आहे. आधुनिक बसगाड्या, वाय-फाय सुविधा आणि आता रितेश-जिनिलिया यांसारखे लोकप्रिय चेहरे यामुळे भविष्यात ‘लालपरी’चा प्रवास अधिक सुखकर आणि ग्लॅमरस होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

विधान

MLC BJP Candidate List: विधान परिषदेसाठी भाजपचे धक्कातंत्र; ३० उमेदवारांची यादी...

0
मुंबई | Mumbaiआगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत ३० जणांची नावे निवडण्यात आली. ही यादी दिल्लीत पाठवण्यात आली...