Tuesday, March 25, 2025
Homeमनोरंजनरीतेश, जेनेलियाने केला मांसाहार न खाण्याचा संकल्प

रीतेश, जेनेलियाने केला मांसाहार न खाण्याचा संकल्प

मुंबई – Mumbai

बॉलीवूड मधील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी अवयव दानाचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय जाहीर केल्यावर रितेश याने मांसाहार, कोल्ड ड्रिंक्स, इरेटेड ड्रिंक्स, ब्लॅक कॉफीचे सेवन करणार नसल्याचे सांगितले. तो म्हणाला, अवयव दानाचा निर्णय घेतल्याने आता मला शरीर स्वस्थ ठेवायचे आहे. जेव्हा अवयव दानाची वेळ येईल तेव्हा हा स्वस्थ आरोग्यपूर्ण अवयव मागे ठेऊन गेला असे लोकांना वाटले पाहिजे अशी माझी इच्छा आहे.

- Advertisement -

कौन बनेगा करोडपतीच्या शुक्रवारी सादर होणार्‍या कार्यक्रमात करमवीर स्पेशल एपिसोड मध्ये ही माहिती रितेशने दिली आहे. या एपीसोड मध्ये मोहन फौंडेशनचे संस्थापक व ट्रस्टी डॉ. सुनील श्रॉफ असतील आणि हॉट सीटवर रितेश असेल. रितेश म्हणाला, गेली काही वर्षे मी आणि जेनेलिया अवयव दान करण्यासंबंधी विचार करत होतो. लॉक डाऊन मुळे या विषयावर विचार करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. नक्की काय करावे लागेल याची माहिती नव्हती. त्यामुळे व्हिडीओ बनवून आम्ही तो पोस्ट केला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....