Thursday, March 13, 2025
Homeक्राईमनदीकाठच्या विद्युत मोटारी चोरीचे प्रमाण वाढले

नदीकाठच्या विद्युत मोटारी चोरीचे प्रमाण वाढले

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील वेळापूर शिवारात विद्युत मोटारी चोरांचा (Water Pump Theft) सुळसुळाट वाढला असून एकाच दिवशी तब्बल सहा विद्युत मोटारी या चोरट्यानी चोरून नेत आपली दहशत केली. यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला असून या चोरट्यांच्या विरोधात त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला (Kopargav Taluka Police Station) फिर्याद दाखल केली आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी विद्युत मोटारी चोरी (Theft) झालेली शेतकर्‍यांच्या वतीने कोपरगाव तालुका सचिव संघटनेचे सदस्य रवींद्र गुजर यांनी केले आहे.

- Advertisement -

नदीकाठी वेळापूर शिवारात असलेल्या रवींद्र गुजर, सुमनबाई मारुती गुजर यांची दहा एचपी विद्युत मोटर या चोरट्यांनी चोरून नेली. मागच्या वर्षी मे महिन्यात देखील रवींद्र गुजर यांच्या विद्युत मोटारीची चोरी झाली होती. त्याचा देखील तपास अद्याप पर्यंत लागलेला नाही. अशोक रामभाऊ आहेर, पार्वताबाई खंडेराव गुजर, रंजना नारायण जगधने, कृष्णा सोमा तळपाडे यांच्याशी साडेसात एचपी च्या विद्युत मोटारी नदी काठावरून एकाच दिवशी चोरी गेल्या. प्रत्येक वेळी शेतकर्‍याला 25 ते 30 हजार रुपये खर्च करून विद्युत मोटर विकत घ्यावी लागते.

यामुळे शेतकर्‍यांना (Framer) आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणाहून चोरी झाली त्या ठिकाणाचा पंचनामा देखील झाला आहे. मात्र या चोरट्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे असून पोलिसांनी यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...