Thursday, May 2, 2024
Homeनगररस्ता सुरक्षा अभियान : हेल्मेट, सीट बेल्ट रॅली

रस्ता सुरक्षा अभियान : हेल्मेट, सीट बेल्ट रॅली

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्यावतीने रस्तासुरक्षा अभियान 2021 अंतर्गत हेल्मेट व सीट बेल्ट रॅलीचे

- Advertisement -

आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याहस्ते व प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी अनिल पवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्पाक खान, पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खान यांनी प्रथम रस्ता सुरक्षा सप्ताह ते 32 वा रस्ता सुरक्षा अभियान या दरम्यान झालेले बदल, ब्लॅक स्पॉट सर्वोच्च न्यायालय यांचे अपघाताबाबत असणारे धोरणे याबाबत मार्गदर्शन केले. प्रांताधिकारी अनिल पवार यांनी हेल्मेट सिट बेल्ट वापराचे आवाहन केले. ज्या पद्धतीने नागरिकांनी करोना महामारीच्या वेळेस नियमाचे पालन केले त्याच पद्धतीने वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

डॉ. दीपाली काळे यांनी पोलीस व आरटीओ रस्ता सुरक्षा अभियान किंवा सप्ताह दरम्यान नियमांची उजळणी करण्याची आठवण करून देतात. नागरिकांनी वर्षभर त्याची अंमलबजावणी करायची आहे. आजची हेल्मेट रॅली श्रीरामपूर शहरातील सर्व रस्त्यावरून जाताना वाहतूक नियमांचे जे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे ते नक्कीच श्रीरामपूरकरांना हेल्मेट वापरण्याचे प्रोत्साहन देईल, असे सांगितले.

त्यानंतर हेल्मेट व सीट बेल्ट रॅलीला मान्यवरांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. यात 50 दुचाकी व ड्रायव्हिंग स्कूलचे वाहनाची रॅली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ते महात्मा गांधी चौक, बेलापूर वेस, शिवाजी चौक, नॉर्दन चौक कॅनाल रोड, सिद्धिविनायक मंदिर, कामगार हॉस्पिटल ते मार्केट यार्ड पेट्रोल पंप येथे सांगता झाली.

रॅलीमध्ये दुचाकीवर गणवेष असणारे आरटीओचे अधिकारी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रॅलीचे नेतृत्व सहायक मोटार वाहन निरीक्षक अर्चना फटांगरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक संदीप निमसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोटार वाहन निरीक्षक निलेश डहाके यांनी परिश्रम घेतले. रॅली मध्ये विविध वाहन विक्रेते यांचे प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या