Wednesday, December 4, 2024
Homeनगरदरोड्याच्या गुन्ह्यातील 8 वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

दरोड्याच्या गुन्ह्यातील 8 वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी फरार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन, पकड वॉरन्टातील इसमांचा शोध घेऊन, अवैध दारु बनविणारे इसमांची माहीती घेऊन कारवाई करणेकामी कोम्बींग ऑपरेशनची मोहीम राबवली असता सदर मोहीमेत दरोडयातील गुन्हयातील गेल्या आठ वर्षापासुन फरार असलेला आरोपी रोहीदास सहादू बर्डे (वय 32) रा. हिंगणी ता. कोपरगाव येथून शिताफीने अटक केली.

- Advertisement -

मोहीमेत सुरेगाव येथे गावठी हातभटटीवर छापा टाकुन पप्पु ओपीन पिंपळे रा. मोतीनगर सुरेगाव याचेकडे 40 हजार रु किंमतीचे 400 लिटर गावठी हातभटटीची तयार करणेस लागणारे कच्चे रसायन जप्त करुन नाश करण्यात आलेले आहे. याबाबत त्याचेविरुध्द पो.कॉ. चंद्रकांत मेढे यांचे फिर्यादीवरुन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 313 / 2023 मु. प्रो. अ‍ॅ. क. 65 (फ) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाईत तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांढेकर, सुरेश गागरे, पो.हे. कॉ. संदिप बोटे, निजाम शेख, पो.कॉ अंबादास वाघ, रशिद शेख, युवराज खुळे, चंद्रकांत मेढे यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या