Sunday, May 19, 2024
Homeजळगावढोल वाजवत रोहीणी खडसे यांनी दिला गणरायाला निरोप

ढोल वाजवत रोहीणी खडसे यांनी दिला गणरायाला निरोप

मुक्ताईनगर Muktainagar

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा (Vice President of Maharashtra State Textile Federation) रोहिणी खडसे खेवलकर(Rohini Khadse Khewalkar) यांच्या निवासस्थानी स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पांचे (residence Ganapati Bappa’s) ढोल ताशांच्या गजरात विसर्जन (sound of drums Immersion) करण्यात आले.

- Advertisement -

माजी मंत्री एकनाथराव खडसे, दुध संघाच्या चेअरमन मंदा ताई खडसे, डॉ प्रांजल खेवलकर, चि. समरजित, कु.सारा यांच्या सह परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी एकनाथराव खडसे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.याप्रसंगी रोहिणी खडसे यांनी ढोल वाजवून मिरवणुकीत सहभाग घेतला.

गणरायाला निरोप देताना रोहिणी खडसे आणि परिवाराने गणरायाचे मनोभावे पुजन केले व राज्याच्या काही भागावर असलेले अतिवृष्टीचे संकट, तर काही भागावर असलेली दुष्काळाची छाया आणि पशुधनावर आलेल्या लंपी आजाराचे विघ्न दुर कर व सर्वांना सुखकारक निरामय आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना रोहिणी खडसे यांनी गणपती बाप्पा चरणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या