Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या'भावी मुख्यमंत्र्यां'च्या यादीत वाढ! अजित पवार, सुप्रिया सुळेंनंतर आता रोहित पवारांचेही बॅनर...

‘भावी मुख्यमंत्र्यां’च्या यादीत वाढ! अजित पवार, सुप्रिया सुळेंनंतर आता रोहित पवारांचेही बॅनर झळकले

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार याची जास्तच चर्चा रंगली आहे. त्यामुळेच राज्यात आधी अजित पवार यांच्या नावाचे बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणुन लागले होते. त्यानंतर त्यात सुप्रिया सुळे यांचाही समावेश झाला. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही सुळे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला होता. या रांगेत आता आमदार रोहित पवार यांचाही समावेश झाला आहे. रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आहे.

- Advertisement -

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिनानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. याची जोरदार चर्चा आता राजकीय क्षेत्रात सुरू आहे. पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर हे बॅनर लागले आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष जात आहे. रोहित पवार यांच्या समर्थकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे फ्लेक्स लावले आहेत. रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे, असा दावा अजित दादांचे समर्थक, पदाधिकारी आणि आमदारांनी केला होता. आज भावी मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांचे बॅनर लागल्याने त्या दाव्यावर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

रोहित पवारांचं नाव घेत छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

अजित पवार म्हणाले; “जोपर्यंत 145ची मॅजिक फिगर…”

अजित पवार म्हणाले, “कोण आता शिल्लकच राहणार नाही. सगळेच आपआपले बोर्ड लावतील. माझे बोर्ड लावत असताना मी मागेच सांगितले की, असे बोर्ड लावून काय होत नाहीत. फक्त कार्यकर्त्याला समाधान वाटते. कोणी कोणाचे बोर्ड लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यावर मी काही कॉमेंट करण्याचे कारण नाही. पण जोपर्यंत कोणतीही व्यक्ती 145चा मॅजित फिगरचा आकडा गाठेपर्यंत मुख्यमंत्री पदाचे स्वप्न हे स्वप्नच राहते.

रोहित पवारांकडून अजित पवार गटावर ब्लॅकमेलिंगचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदार आणि खासदारांना अजित पवार यांच्या गटात प्रवेश सहभागी व्हावे म्हणून ब्लॅकमेल केले जात आहे, त्रास देण्यात येत आहे. तू प्रतिज्ञापत्रावर सही कर नाहीतर अमुक-अमुक काम होणार नाही असे संबंधित आमदार खासदार यांना सांगितले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या