Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: अजित दादांच्या कार्याकडे बघून शंभर टक्के मतदान; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी...

Rohit Pawar: अजित दादांच्या कार्याकडे बघून शंभर टक्के मतदान; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

बारामती | Baramati
बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. २३ एप्रिलला मतदान आहे, त्यामुळे दिवस कमी आहेत. वेगवेगळ्या भागात प्रचार केला तर व्याप्ती वाढते. त्यांचा वेगळ्या बाजूचा प्रचार सुरू आहे, आमचा दुसऱ्या बाजूचा प्रचार सुरू आहे. परिवारातील इतरही लोक आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. यावेळी आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, भगिनी सई पवार देखील उपस्थित होते.

तेवढे सर्व मतदान ९९ टक्के सुनेत्रा काकींना होईल
यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, सुनेत्रा काकींच्या विरोधात उभे राहिलेले २२ लोक आहेत, त्यांना प्रत्येकाला एखादे दुसरे मत मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. बाहेरून आलेले लोक आहेत, त्यांना शून्य मतदानही होऊ शकते. जेवढे मतदान जास्त होईल तेवढे सर्व मतदान ९९ टक्के सुनेत्रा काकींना होईल. मतदान होईल त्यातील ९९ टक्के मतदान अजितदादांच्या पक्षाला होईल, ते दादांकडे बघून होईल, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

Bihar Politics : बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या रुपात मिळाला भाजपचा पहिला मुख्यमंत्री; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

बारामतीकरांना आदेश देऊ शकत नाही
मी रोहित पवार म्हणून नाही तर अजित दादांचा पुतण्या म्हणून आणि दादांचा कार्यकर्ता म्हणून प्रचारात आलेलो आहे. अजित होत आहे दादांचे काम बारामतीकरांना माहिती आहे. दादा गेल्यानंतर बारामतीची पोटनिवडणूक होत आहे, सुनेत्रा पवार उभे आहेत. अजित दादांच्या कार्याकडे बघून शंभर टक्के मतदान प्रत्येक गावातून सुनेत्रा पवार यांना व्हावं ही विनंती मी करत आहे. बारामतीकरांना तुम्ही आदेश देऊ शकत नाही तुम्ही त्यांना विनंती करू शकता. इथे असणाऱ्या लोकांचं आभार परिवारावर प्रेम आहे. मी लोकांशी संवाद साधलेला आहे. हा प्रचार दौरा नसून मी लोकांच्या गाठीभेटी घेत आहे.

SambhajiRaje Chhatrapati : आपली नैतिक जबाबदारी आणि सामाजिक भान काही आहे की नाहीच? प्री वेडिंग शूटवरून संभाजीराजे छत्रपतींचा संतप्त सवाल

भावनिक नातं सोडलं तर मला असं वाटतं की दुसरा कुठलाही विषय नाही
अजित दादांनी अनेक लोकांना राजकारणात येण्यासाठी मदत केलेली आहे, सामाजिक दृष्टिकोन ठेवून मदत केली आहे, व्यक्तिगत मदत केली आहे. या निवडणुकीत आमच्यासारखे लोक किंवा इतर लोकप्रचारात सहभाग घेत आहेत, ते अजितदादांनी केलेल्या मदतीमुळे दिलेल्या प्रेमामुळे दिलेल्या ताकतीमुळे. अजितदादांच्या प्रति असणारा आदर आणि प्रेम यासाठी लोक प्रचार करत आहेत. भावनिक नातं सोडलं तर मला असं वाटतं की दुसरा कुठलाही विषय नाही.

त्यांचा वेगळ्या बाजूचा प्रचार सुरू आहे, आमचा दुसऱ्या बाजूचा प्रचार सुरू
सर्वजण आपापल्या लेव्हलवर प्रचार करत आहेत. 23 तारखेला मतदान आहे दिवस कमी आहेत. आपापल्या लेव्हलला वेगवेगळ्या भागात प्रचार केला तर व्याप्ती वाढत असते. त्यांचा वेगळ्या बाजूचा प्रचार सुरू आहे, आमचा दुसऱ्या बाजूचा प्रचार सुरू आहे. परिवारातील इतरही लोक आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत, असेही रोहित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

पडसाद : आधीच विकासाची हौस, त्यात खरोखरीचा आला पाऊस

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे | Nashik यंदाच्या हंगामातील पहिल्याच पावसाने (Rain) नाशिककरांची आणि प्रशासनाचीही चांगलीच दाणादाण उडविली. 'आधीच हौस त्यात पाऊस' या उक्तीची प्रचिती आली....