Saturday, October 5, 2024
Homeक्रीडाRohit Sharma : आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्माची मोठी झेप; 'या' स्थानावर...

Rohit Sharma : आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्माची मोठी झेप; ‘या’ स्थानावर झाला विराजमान

मुंबई | Mumbai

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून नुकतीच एकदिवसीय सामन्यांची ताजी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहेत. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात पार पडून गेलेल्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत (Series) भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, या मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : काँग्रेसचे ‘हे’ दोन आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

या मालिकेत रोहित शर्माने (Rohit Sharma) १५७ धावा केल्या होत्या. तसेच श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज पथुम निसांकाने १०१ धावा केल्या होत्या. त्यानंतर आता रोहित शर्माने शुभमन गिलला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या खात्यात ७६५ गुण आहेत. तर ७६३ गुणांसह शुभमन गिल तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच विराट कोहलीने आपला चौथा क्रमांक कायम राखला असून श्रीलंकेचा पथुम निसांका आठव्या स्थानावर आहे.

हे देखील वाचा : गुड न्यूज! एसटी महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर; ३१ पैकी १८ विभागांनी जुलै महिन्यात कमावला ‘इतक्या’ कोटींचा नफा

याशिवाय यष्टिरक्षक फलंदाज कुशल मेंडिस आणि आविष्का फर्नांडो यांनी मोठी झेप घेतली आहे. कुशल मेंडिसने ५ स्थानांची प्रगती करत ३९ व्या स्थानावर आहे. तर फर्नांडोने २० स्थानांची प्रगती साधत ६८ वे स्थान गाठले आहे. तर मधल्या फळीतील फलंदाज दुनीथ वेललागेने १७ स्थानांनी झेप घेतली असून तो आता ५९ व्या स्थानावर आहे.त्यासोबतच भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजची (Mohammad Siraj) क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. तो आता ५ स्थानांनी पिछाडीवर पडत नवव्या स्थानावर आहे.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात पावसाची उघडझाप; गंगापूर धरणातील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर

दरम्यान, मोहम्मद सिराजच्या या स्थानावर न्यूझीलंडचा डावखुरा गोलंदाज ट्रेंट बोल्ट आहे. तर भारताचा चायना मन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव चौथ्या स्थानावर असून जसप्रीत बुमराह आठव्या स्थानावर आहे. तर पहिल्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज असून दुसऱ्या स्थानावर जॉश हेझलवूड आहे. तर फिरकी गोलंदाज अ‍‌ॅडम झम्पा तिसऱ्या स्थानावर आहे.

सलिल परांजपे, नाशिक

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या