Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रगुड न्यूज! एसटी महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर; ३१ पैकी १८ विभागांनी जुलै महिन्यात...

गुड न्यूज! एसटी महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर; ३१ पैकी १८ विभागांनी जुलै महिन्यात कमावला ‘इतक्या’ कोटींचा नफा

मुंबई | Mumbai

गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला (MSRTC) भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू असून, जुलै महिन्यात ३१ विभागांपैकी १८ विभागांनी नफा (Profit) कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा २२ कोटी इतका नाम मात्र झालेला आहे. यंदा एप्रिल ते जुलै २०२४ मध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १३१ कोटी रुपयांनी तोटा कमी झाला आहे. जुलै महिन्यात नफा कमावणाऱ्या विभागांचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी अभिनंदन केले असून, उर्वरित विभागांनी देखील प्रयत्नांची पराकाष्टा करून ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महामंडळ फायद्यात येईल असे प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : काँग्रेसचे ‘हे’ दोन आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

दोन वर्ष करोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय ? अशी अवस्था निर्माण झाली होती. मे २०२२ पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या ५३ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत.

हे देखील वाचा : “एकनाथ शिंदे हे सर्वात लोचट मुख्यमंत्री”; संजय राऊतांची घणाघाती टीका

याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान”, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्या मध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात पावसाची उघडझाप; गंगापूर धरणातील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर

या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून जुलै महिन्यामध्ये ३१ विभागांपैकी १८ विभाग नफ्यामध्ये आले आहेत. त्यापैकी जालना (३.३४ कोटी), अकोला (३.१४ कोटी), धुळे (३.७ कोटी), परभणी (२.९८ कोटी), जळगाव (२.४० कोटी), बुलढाणा (२.३३ कोटी) या ‍विभागांनी २ कोटी पेक्षा जास्त नफा कमावला आहे. तर ऑगस्ट महिन्यात उर्वरित विभाग देखील नफ्यामध्ये येतील व पर्यांयाने महामंडळ नफ्यात येईल जेणेकरुन एसटीला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Suicide News : मानसिक त्रास व धमक्यांना घाबरून महिलेसह प्रियकराची...

0
नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon फोनद्वारे आणि प्रत्यक्ष शारिरीक सुखाची मागणी करुन तसेच दिलेल्या मानसिक त्रासाला व धमक्यांना कंटाळून तालुक्यातील वंजारवाडी (Vanjarwadi) येथील प्रेमीयुगलाने धावत्या...