Friday, May 16, 2025
Homeब्रेकिंग न्यूजWankhede Standium Stand: वानखेडे स्टेडीयमच्या स्टँड्सला रोहित शर्माचे, शरद पवार, अजित वाडेकरांचं...

Wankhede Standium Stand: वानखेडे स्टेडीयमच्या स्टँड्सला रोहित शर्माचे, शरद पवार, अजित वाडेकरांचं नाव; MCA कडून ‘हिटमॅनचा’ गौरव

मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या क्रिकेटमधील भरीव योगदानाचा गौरव म्हणून मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियममध्ये त्याच्या नावाने खास स्टँड उभारण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. १६) या स्टँडचे भव्य उद्घाटन पार पडले. त्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, अजित वाडेकर यांचे ही नाव स्टँडला देण्यात आले आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, MCA अध्यक्ष अजिंक्य नाईक, यांच्यासह भारतीय क्रिकेट मंडळाचे अधिकारी, आजी माजी खेळाडू आणि क्रिकेटच्या चाहत्यांचा समावेश होता.

- Advertisement -

मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम, जिथे रोहित शर्माने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत, तिथे आता रोहित शर्मा स्टँड म्हणून ओळखले जाणारे स्टँड असेल. वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावावर स्टँड आहेत आणि रोहितचे नावही त्या यादीत जोडले गेले आहे.

वानखेडे स्टेडियमवरील पॅव्हेलियनच्या तिसऱ्या स्टँडला रोहितचे नाव देण्यात येणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला आहे. जरी त्याने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मुंबईसाठी त्याने ४६ प्रथम श्रेणी सामने, १७ लिस्ट ए सामने आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत.

उद्घाटनप्रसंगी रोहितने भावना व्यक्त करताना म्हटले की, “माझ्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात याच मैदानावर झाली आणि आज माझ्या नावाचा स्टँड इथे असणे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ही बाब मी कायम मनात जपून ठेवीन.”

विशेष म्हणजे रोहितच्या प्रत्येक चढत्या आणि उतरत्या काळात त्याची नेहमी साथ देणारी त्याची पत्नी रितिका देखील यावेळी उपस्थित होती. यावेळी रोहित शर्माच्या नावाच्या स्टॅन्डच उद्घाटन पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले होते. यावेळा ती आपले अश्रू लपवताना दिसली. रोहित देखील या क्षणी प्रचंड भावूक झाला होता.त्या देखील हा क्षण पाहून खूप आनंद झाला होता.

‘रोहित शर्माचे नाव खेळत असताना स्टँडला मिळाले हे खरे तर अभिमानाची बाब आहे. असे पहिल्यांदाच घडले आहे. रोहित यासाठी खऱ्या अर्थाने पात्र आहे. मला असे वाटते यामुळे रोहित शर्मा अधिक चांगला खेळेल आणि अधिक काळ खेळेल. चांगले खेळाडू रिटायर व्हावे असे आपल्याला कधी वाटतच नाही. निश्चितपणे तो अधिक चांगला खेळेल याचा मला विश्वास आहे.’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

एक स्टायलिश नंबर ३ फलंदाज आणि भारताच्या सर्वोत्तम स्लिप क्षेत्ररक्षकांपैकी एक, अजित वाडेकर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील ऐतिहासिक परदेशातील कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व केले. त्यांनी १९६६ ते १९७४ दरम्यान ३७ कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळले आणि १९५८-६९ मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले. ऑगस्ट २०१८ मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

तर शरद पवार यांनी २००५ ते २००८ पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि २०११ चा वर्ल्ड कप भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मी राज्यात क्रीडामंत्री होतो तेव्हा जागा देण्यापासून ते स्टेडियम उभारण्यात अनेकजण सोबत होते.या स्टेडियमला एक इतिहास आहे, असंही सांगण्यास शरद पवार विसरले नाहीत. काही सहकाऱ्यांचे स्मरण होणे आवश्यक आहे.सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांचे योगदान नोंदणीय आहे, असं सांगत त्यांच्या नावाचा उल्लेख केला. महाराष्ट्राचे हे वैभव घराघरात पोहोचले, याची जाणीव ठेऊन रोहित शर्माचे नाव स्टँडला दिले. यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी असोसिएशनचे आभार मानले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : दुर्देवी! आठवड्यावर होतं लग्न अन् काळाने केला मोठा...

0
  जामखेड । तालुका प्रतिनिधी नाहुली येथील व्हेटरनरी डॉक्टर प्रल्हाद जाधव (वय २४) यांचा आज सकाळी झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. खर्डा रोडवरील कोल्हे पेट्रोल पंपाजवळ...