Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्ररोटरीच्या माध्यमातून उजळली तीन गावे

रोटरीच्या माध्यमातून उजळली तीन गावे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे (RCB)ने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कंभारे, कुयुलु आणि सावरखंड या तीन गावांमध्ये सौर उर्जेसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे नागरिकांना जीवन जगणे सूकर झाले आहे. आरसीबीने व्यापक उद्दीष्ट ठेवत ग्रामीण संपर्क घट्ट ठेवला आहे. या सौर उर्जा प्रकल्पाचे रविवारी (दि. 26) लोकार्पण करण्यात येणार आहे…

- Advertisement -

आरसीबीचे अध्यक्ष विनीत भटनागर यांनी सांगितले की, केवळ तीन वर्षांत आम्ही आमच्या भागीदार चिराग फाऊंडेशनसह मुंबईजवळील 36 गावांमधील 10 हजार 186 लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करण्याचा प्रयत्न केला आहे. या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आरसीबीने 263 किलोवॅट सौरऊर्जा उपलब्ध करून दिली आहे. 23 गावातील शाळांना हरित ऊर्जेने उजळून टाकले आहे. दररोज 30 हजार 558 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले आहे.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? मग आधी ही बातमी वाचा

चिराग फाऊंडेशनच्या संचालिका प्रतिभा पै यांनी सांगितले की, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे आणि देणगीदारांच्या माध्यमातून खांबरे, कुयुलू आणि सावरखंड या तीन गावांच्या प्रकल्पातून तेथील नागरीकांचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आरसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सर्व कुटुंबांसाठी सोलर बॅकअप दिवे, अंगणवाडीला हरित ऊर्जा आणि अनेक योजनाबद्ध सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे दिल्याने त्यांच्या जीवनात खर्‍या अर्थाने प्रकाश टाकण्यात यश लाभले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान; म्हणाले, हिंमत असेल तर…

आरसीबी इंटिग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे चेअरपर्सन मिहिर मोदी यांनी सांगितले की, आरसीबीच्या माध्यमातून उभारलेल्या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील बांधवांसाठी शाश्वत आरोग्य, स्वच्छता, सिंचन आणि शिक्षणाव्यतिरिक्त मदत झाली आहे. आरसीबीच्या सदस्यांचे यात मोलाचे योगदान आहे. जीवनात असा सर्वसमावेशक बदल होताना पाहणे आमच्यासाठी आनंददायी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या