Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्ररोटरी क्लब ऑफ बॉम्बेने राबविला वनवासी येथे एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प

रोटरी क्लब ऑफ बॉम्बेने राबविला वनवासी येथे एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प

मुंबई | Mumbai

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे व चिराग रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वनवासी गावात एकात्मिक ग्रामविकास योजना उपक्रमाची सांगता करण्यात आली…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती देताना आरसीबीचे अध्यक्ष विनीत भटनागर म्हणाले की, सातत्याने आमच्या प्रकल्पांमध्ये एकात्मिक दृष्टीकोन राहिला आहे. त्यानुसार आता हा प्रकल्प ३७ गावे आणि वाड्यांमधील सुमारे १० हजार ८३० ग्रामस्थांचे जीवन बदलण्यास उपयुक्त ठरेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून ३५ हजार ५५८ लीटर सुरक्षित पिण्याचे पाणी देता आले आहे. तसेच या प्रकल्पामुळे २८० एकर शेतजमीन लागवडीखाली आणली जाऊ शकते. १७६ किलोवॅट सौरऊर्जा निर्माण करण्यात आली असून २४ शैक्षणिक सुविधांना शाश्वत ऊर्जा उपलब्ध करुन दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय वनवासी गाव प्रकल्पासाठी गीता केशवन या एकमेव देणगीदार आहेत. प्रतिभा पै संस्थापक चिराग ग्रामीण विकास फाउंडेशन या उपक्रमात मोलाचे योगदान दिले आहे. तर समितीचे अध्यक्ष मिहीर मोदी यांनी म्हटले की, आम्ही खूप समाधानी असून या कार्यक्रमाने ग्रामीण जनतेचे जिवनमान उंचावण्यात मदत होणार आहे.

उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा

उंच डोंगरावर वसलेल्या वनवासी गावाला गावातील विहिरीत सबमर्सिबल सोलर पंप प्रदान करण्यात आला आहे. १२० घरांना पिण्याचे पाणी देण्यासाठी सोलर सिस्टीमद्वारे चालविले जाते. आणखी एक सबमर्सिबल सोलर पंप आहे. जवळील धरण, १० किलो वॅटचे सौर प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जे १००० मीटर एचडीपीई पाईपलाईन ओलांडून २० एकरपेक्षा जास्त शेतजमिनीला पाणी पुरवते. सर्व १२० घरांना बॅक-अप लाइटिंगसाठी सौर दिवे मिळतील ज्याची खूप मदत होईल.

पावसाळ्यात जेव्हा वारंवार वीज खंडित होते. त्यांना पिण्याचे सुरक्षित पाणी सुनिश्चित करण्यासाठी वैयक्तिक वॉटर फिल्टर देखील मिळतील.समाजाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी गावात १५ सौर उर्जेवर चालणारे पथदिवे धोरणात्मकपणे ठेवण्यात आले आहेत. अंगणवाडीला ३५० वॅट ऑफ-ग्रिड सोलर सिस्टीम मिळाली असून प्राथमिक आरोग्य केंद्राला सतत वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी स्वतंत्र २ किलो वॅटची सौर यंत्रणा देण्यात आली आहे.

तर काही गावांमध्ये राईस मिल, एक राईस हलर, सावडे गावात संपूर्ण कम्युनिटी हॉल, काही उच्च प्राथमिक शाळांची पुनर्बांधणी करण्यात आली. पिंगेमन गावाप्रमाणेच संगणक दिले गेले असून गडदे गावात सौरऊर्जेवर चालणारे सामुदायिक केंद्र बांधले गेले आहे. तसेच महिलांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी शिलाई मशीन देण्यात आली असून अनेक शाळांच्या बाथरूमचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले. या सुनियोजित हस्तक्षेपामुळे खर्‍या अर्थाने नागरिकांना मदत झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या