Friday, September 20, 2024
Homeक्राईमNashik News : प्रादेशिक परिवहन विभागाकडून मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई

Nashik News : प्रादेशिक परिवहन विभागाकडून मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

- Advertisement -

वाढते अपघात (Accident) मोठया प्रमाणात ड्रिंक ॲन्ड ड्राइव्ह या परिस्थिती थांबविण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन मंडळ (Nashik Regional Transport Board) यांच्याकडून मोबाईलवर बोलणे, सिग्नल जम्प तसेच मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई (Action) करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बावीस लाखांचे बोगस खत जप्त; दाेघांवर गुन्हा

दिवसेंदिवस राज्यात वाहन अपघातांची संख्या वाढत आहे. विशेषतः दुभाजकाला वाहन धडकने, नियंत्रण सुटणे, यामुळे वाहन अपघात वाढले आहेत. यामध्ये दारूच्या (Alcohol) नशेत वाहन चालविणाऱ्यांवर वचक ठेवून, वाहन अपघात कमी करण्यास मदत होईल. त्याअनुषंगाने आरटीओकडून काही दिवसांपासून खासगी बस, शालेय वाहने यांची तपासणी सुरू आहे. दोषी आढळल्यास नशेबाज चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : Nashik News : सिटीलिंकच्या चालकांविरोधात मेस्मा कायद्याअंतर्गत नाशिकरोड व आडगावला गुन्हे

ड्रिंक ॲन्ड ड्राइव्ह (Drink and Drive) करणाऱ्यांविरोधात परिवहन विभागाकडून यापुढे कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दै .देशदूत शी बोलतांना दिली. ज्या वाहनाचा (Vehicle) विमा नसेल ते वाहन जप्त केले जाणार आहे. तसेच विमा नसलेले किंवा विम्याची मुदत संपलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास अशा वाहनावर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Accident News : स्विफ्ट कार व मोटारसायकल अपघातात युवक ठार

दरम्यान, अनेक अपघात हे वाहनचालकांनी दारुच्या नशेत वाहने चालविल्याने होत असल्याचे विविध अहवालातून निष्पन्न झाले आहे. हे रोखण्यासाठी आरटीओकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. तसेच पंचवटी, आडगाव, म्हसरूळ या ठिकाणी मोटर वाहन निरीक्षक घनशाम चव्हाण,सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भाग्यश्री पाटील,महेश बोन्द्रे,वाहन चालक पंकज मोकाशे तसेच वायूवेग पथक क्रमांक १ यांच्यातर्फे मोबाईल ४, सिग्नल जम्प १५ तर मद्यप्राशन १३० तपासणी करून ४ जणांवर कारवाई करण्यात आली. यातील बहुतांश कारवाया या दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी झाल्या आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या