Tuesday, March 25, 2025
Homeनगरपसंतीचा वाहन क्रमांक मिळण्यासाठी करा ऑनलाईन अर्ज!

पसंतीचा वाहन क्रमांक मिळण्यासाठी करा ऑनलाईन अर्ज!

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुविधा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी परिवहन कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहनधारकांना पसंती क्रमांक शुल्क आता ऑनलाईन भरता येणार असून या सुविधेचा लाभ वाहनधारकांनी घ्यावा, असे आवाहन अहिल्यानगरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सरगे यांनी केले आहे. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहनधारक परिवहन कार्यालयात येऊन पसंती क्रमांक शुल्क भरणा करून त्यांच्या वाहनांकरिता पसंती क्रमांक घेत असतात. मात्र 26 नोव्हेंबरपासून शासनाने fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर पसंती क्रमांक शुल्क ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

- Advertisement -

ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहराविरहित) स्वरूपाची असून त्यासाठी अर्जदारास आधार संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हा मोबाईल क्रमांक नोंद करून मोबाईलव्दारे ओटीपी प्राप्त करून परिवहनच्या संकेतस्थळावर पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करता येणार आहे. विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका सुरू केल्यानंतर प्रथम संबंधित कार्यालयामार्फत आकर्षक अथवा पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. त्यामध्ये पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीच्या रकमेचा धनाकर्ष सादर करणार्‍या अर्जदारास संबंधित कार्यालयातील रोखपालव्दारे पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क भरणा केल्याची पावती जारी करण्यात येईल, असे सरगे यांनी सांगितले.

असा मिळवा ऑनलाईन क्रमांक
अर्जदाराने fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर जावून न्यु युजर / रजिस्टर नॉऊ यावर क्लिक करावे. यामध्ये संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून ईमेल व मोबाईल क्रमांक ओटीपीव्दारे पडताळून घ्यावे. त्यानंतर संकेतस्थळावर लॉग इनमध्ये जावून ईमेल किंवा मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेले युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. त्यानंतर अर्जदाराने ऑनलाईन उपलब्ध असणारे पसंती क्रमांक निवडावे. यासाठी घेण्यात येणारे शुल्क एसबीआय ई- पे या पेमेंट गेटवेवरून ऑनलाईन अदा करावे आणि प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर ई पावती प्रिंट काढून संबंधित वाहन विक्रेत्याकडे (डीलरकडे) नोंदणीसाठी देण्यात यावी.

ज्या व्यक्तीच्या नावाने वाहन खरेदी करायचे आहे त्या व्यक्तीच्या नावानेच पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक ऑनलाईन आरक्षित करावा. अर्जदारास आधार संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हा मोबाईल क्रमांक नोंद करून मोबाईलव्दारे ओटीपी प्राप्त करून परिवहनच्या संकेतस्थळावर पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करता येणार आहे.
– विनोद सरगे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...