Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकRupali Chakankar: मालेगाव चिमुरडी अत्याचार प्रकरणावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची संतप्त...

Rupali Chakankar: मालेगाव चिमुरडी अत्याचार प्रकरणावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, तशाच वेदना आरोपीला…

पुणे | Pune
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने आधी चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने तिचे डोके ठेचून अमानुषपणे हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मालेगावातील चिमुरडीला न्याय देण्यासाठी आता महिला आयोग अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. आरोपीला अटक केली पण केवळ आरोपीला अटक करणे एवढ्यावर थांबले नाही तर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फास्ट ट्रॅकवर केस चालली पाहिजे ही आम्ही मागणी केली आहे.

- Advertisement -

लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला आधी कमी शिक्षा होती ती आता नवीन कायद्यानुसार कठोर केली आहे. याधीच्या घटनांमध्ये महिला आयोगाने पाठपुरावा केला. तीन घटनेत आरोपीला कठोर शिक्षा देण्यात आली आहे. मात्र, तळपायाची आग मस्तकात जाणारी ही घटना आहे. त्या मुलीला वेदना झाल्या असतील तशाच वेदना आरोपीला झाल्या पाहिजेत, अशी सर्वांची मागणी आहे. पण कायद्यानुसार त्याला शिक्षा दिली जाईल. मी कुटुंबियांची भेट घेणार आहे. त्यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेणार आहे. त्यांनतर पुढील भूमिका मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

YouTube video player

देशदूत व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...