Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशRussia Ukraine War : रशियाकडून तात्पुरता युद्धविराम

Russia Ukraine War : रशियाकडून तात्पुरता युद्धविराम

दिल्ली | Delhi

रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) गेल्या दहा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत युक्रेनची मोठ्या प्राणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. (Russia declares ceasefire in Ukraine to open humanitarian corridors for civilians)

- Advertisement -

रशियन सैनिक युक्रेनमध्ये घुसल्याने लोक जीव मुठीत घेऊन लपून बसले आहेत. अनेकजण बंकर्समध्ये लपून बसले आहेत. तसेच परदेशातील अनेक विद्यार्थी आणि नागरिकही युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. युक्रेनच्या सीमेवर या परदेशी नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे या नागरिकांना मायदेशी सुखरूप परतता यावं म्हणून जगातील अनेक देशांनी रशियावर (Russia) दबाव वाढवला होता. त्यामुळे रशियाने अखेर काही काळापुरता युद्धविराम जाहीर केला आहे.

रशियाच्या या निर्णयाचा मोठा फायदा भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना होईल. एकूणच हा युद्धविराम ५ तासांसाठी असल्याची माहिती आहे. युद्धविराम झाल्याने या काळात नागरिक सुरक्षित स्थळी जाऊ शकतात. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे रशियाने म्हटलं आहे.

Russia Ukraine War : युक्रेनमधून आतापर्यंत बारा लाख लोकांचे स्थलांतर

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याला आपले प्राण गमावावे लागले आहेत. तर एक विद्यार्थ्याला गोळी लागली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रशियाने काहीकाळासाठी युद्ध थांबवल्याने अनेंकाना स्थलातंर करण्यासाठी वेळ मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या