Thursday, May 9, 2024
Homeदेश विदेशRussia Ukraine War : गोळीबारात एक भारतीय विद्यार्थी जखमी, उपचार सुरु

Russia Ukraine War : गोळीबारात एक भारतीय विद्यार्थी जखमी, उपचार सुरु

दिल्ली l Delhi

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. (Russia Ukraine conflict Another Indian student shot in Kyiv hospitalised)

- Advertisement -

रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेसह (US) अनेक युरोपीन राष्ट्रांकडून (European nations) रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र या दबावाला न जुमानता रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच रशियन सैन्याच्या (Russian army) गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये (Kyiv) झालेल्या गोळीबारात जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह (Civil Aviation Gen (Retd) VK Singh) यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. ‘कीव्हमध्ये एका विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती मिळाली असून त्याला तातडीने कीव्ह येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’, असे सिंह म्हणाले.

भारतीय दूतावासाने (Indian Embassy) अॅडव्हायजरी जारी करून भारतीयांना तातडीने कीव्ह सोडण्याची सूचना केली होती. पण कीव्हमधून बाहेर पडण्यासाठी ट्रेनमध्ये विद्यार्थ्यांना चढू देत नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. अनेक विद्यार्थी अडकून पडले आहेत.

दरम्यान युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी सुरक्षित परतण्यासाठी पोलंडच्या (Poland) सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांना मायदेशात सुरक्षित आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्री, हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri), ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia), किरेन रिजिजू (Kiren Rijiju) आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग, युक्रेनला लागून असलेल्या देशांमधील स्थलांतराच्या प्रयत्नांवर देखरेख करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या