Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशRussia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युरोपातील सर्वात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटमध्ये आग,...

Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युरोपातील सर्वात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटमध्ये आग, संपूर्ण युरोप धोक्यात

दिल्ली l Delhi

रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरू असलेल्या युद्धाचा आज नववा दिवस आहे. दरम्यान, आता परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. रशियाकडून (Russia) सातत्यानं युक्रेनवर (Ukraine) हल्ले सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होत आहे.

- Advertisement -

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. रशियाने (Russia) युक्रेवर (Ukraine) केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेसह अनेक युरोपीन राष्ट्रांकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र या दबावाला न जुमानता रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे.

दरम्यान, आता रशियाच्या हल्ल्यांमुळे युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाजवळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेननं आगीची माहिती देतानाच स्फोट झाला, तर चर्नोबिलपेक्षा १० पट अधिक तीव्रतेचा असेल, अशी भीती व्यक्त केली आहे. इनरडोहार शहरानजीक असलेल्या झोपोरिझिया (Zaporizhzhia NPP) येथे युरोपातील सर्वात मोठा अणु ऊर्जा प्रकल्प असून, रशियाच्या हल्ल्यांमुळे प्रकल्पा धोका निर्माण झाला आहे.

आत्महत्या की घातपात? बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी आगीनंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ले मागे घेण्याचे आवाहन रशियन सैन्याला केलं आहे. कुलेबा यांनी ट्विट केलं की, जर तो स्फोट झाला तर तो चोरनोबिलपेक्षा १० पट मोठा स्फोट असेल. रशियन लोकांनी आग त्वरित थांबवली पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या