Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रखंडित वीज पुरवठ्यामागे घातापात?

खंडित वीज पुरवठ्यामागे घातापात?

मुंबई : मुंबई व ठाणे येथे सोमवारी वीज पुरवठा होण्यामागे खंडित घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितिन राऊत यांनी आज दिली.

कळवा पडघे 400 के व्ही वीज वहिनीत 12 ऑक्टोबर रोजी अचानक तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होऊन मुंबई व त्याच्या आजूबाजूच्या उपनगरात वीज पुरवठा खंडित झाल्याने जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे डॉ राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

मुंबई शहर अंधारात जाणे ही साधीसुधी घटना नाही. यापूर्वी 2011 मध्ये अशा प्रकारे वीज पुरवठा खंडित झाला होता. यावर एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर करून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी काही उपाययोजना सुचविलेल्या होत्या. त्यावर अंमलबजावणी झाली किंवा नाही हे तपासून बघण्यात येणार आहे, यासाठी कृती अहवाल (एटीआर) मागवला आहे, अशी माहिती डॉ राऊत यांनी दिली.

या घटनेची चौकशी करताना सर्व तांत्रिक बाबी तपासून घेण्यात येणार असून वीज सुरक्षा साधनांची व उपाय योजनांचे ऑडिट करण्यात येणार आहे. लवकरच यावर अहवाल सादर करण्यात येणार आहे. काही लोक ऊर्जा खात्याला बदनाम करायचं काम करत आहे, असे मत डॉ. राऊत यांनी व्यक्त केले.मुंबई व त्याच्या आजूबाजूच्या उपनगरात वीज पुरवठा खंडित झाल्याने जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे डॉ राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने सुद्धा यावर एक समिती नेमली आहे. ही समिती ही सध्या मुंबईच्या भेटीवर असून वीज पुरवठा ठप्प होण्यामागील कारणांचा शोध घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप घाणेरडे राजकारण करतेय

“राज्यात, देशात व जगात तांत्रिक कारणाने वीज यंत्रणेत बिघाड होऊन विद्युत पुरवठा मोठ्या प्रमाणावर खंडित होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. याला कोणताही पक्ष, सरकार वा देशही अपवाद नाही. तांत्रिक बिघाड होऊन मुंबई व ठाण्यात साधारणतः चार ते पाच तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भाजपने याचा राजकीय फायदा उचलण्याचा कुत्सित प्रकार केलेला आहे.

भोपाळमध्येही मुंबईच्या आदल्या दिवशी 11 ऑक्टोबरला सहा तास वीज नव्हती. तेव्हा मात्र भाजपने मौन का साधले? भोपाळमध्ये घडलेला हा प्रकार म्हणजे मध्यप्रदेशातील भाजप सरकारचे अपयश म्हणायचे का?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.यापूर्वी राज्यात भाजपचे सरकार असताना सन 2014 ते 2019 या काळातसुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. जून 2018मध्ये भाजपची सत्ता असतानाही मुंबई आणि परिसर असाच अनेक तास रात्री अंधारात होता. तसेच जून 2016, डिसेंबर 2017 या काळातही जवळपास 12 ऑक्टोबरला झाला तश्याच पद्धतीने किंवा तांत्रिक बिघाडामुळे अनेक तास वीज पुरवठा ठप्प झाला होता.यापूर्वीही विविध पक्षांचे सरकार असतानाही राज्यात आणि देशपातळीवरही असे वीज पुरवठा ठप्प होण्याचे प्रकार घडले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या