Monday, October 28, 2024
HomeराजकीयSada Sarvankar vs Amit Thackeray : अमित ठाकरेंचा मार्ग खडतर? सदा सरवणकर...

Sada Sarvankar vs Amit Thackeray : अमित ठाकरेंचा मार्ग खडतर? सदा सरवणकर निवडणूक लढण्यास ठाम

मुंबई । Mumbai

मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने महेश सावंत तर शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिल्याने येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणून महायुती माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देणार तसेच येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे आपली उमेदवारी मागे घेणार, अशी चर्चा रंगली आहे. मात्र शिंदे गटाचे उमेदवार असलेले सदा सरवणकर यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याच ठामपणे सांगितलं आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना सदा सरवणकर (Sada Sarvankar) म्हणाले की, मी उद्या सकाळी १० वाजता उमेदवारीचा अर्ज भरणार आहे. त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे. माहीमधील जनतेला न्याय देणं ही आजच्या काळाची गरज आहे. मी उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी देखील होणार, असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला.

आम्ही ३६५ दिवस या मतदारसंघात काम करतो. मी तीन वेळा नगरसेवक, तीन वेळा आमदार म्हणून निवडणून आलो आहे.एकनाथ शिंदेंनी आर्शिवाद दिले आहेत. एकनाथ शिंदे आणि माझी भेट नियमीत भेट होती. मला राज ठाकरेंना फोन आलेला नाही, अशी माहिती देखील सदा सरवणकर यांनी दिली. आशिष शेलार आणि दीपक केसरकर यांनी जे मत व्यक्त केलं ते त्याचं वैयक्तिक मत आहे, असंही सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अमित ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलताना म्हणाले, माझा उमेदवारी अर्ज भरताना बरेच लोक आले होते. या माहीममध्ये मी लहानाचा मोठा झालो. अनेकांना मी काका बोलतो, ते सर्व हजर होते, मला बरं वाटलं’ असं अमित ठाकरे म्हणाले. ‘मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहणार. मी माझं व्हिजन घेऊन लोकांपर्यंत जाणार. २३ तारखेला लोक काय कौल देतात? ते समजेल, असं अमित ठाकरे म्हणाले. तसेच, राजकीय सभांवर भर देणार की, दारोदार प्रचारावर, यावर अमित ठाकरे यांनी ‘दारोदार प्रचारावर भर असल्याच सांगितलं’. सभांऐवजी मला प्रत्येक घरापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचायच आहे. वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, तो सार्थ करायचा आहे’ असं अमित ठाकरे यांनी सांगितलं.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या