Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधब्रह्म मुहूर्त : स्वतःला घडविण्याची वेळ

ब्रह्म मुहूर्त : स्वतःला घडविण्याची वेळ

प्रश्न: ब्रह्म मुहूर्ताची नक्की अचूक वेळ काय आहे? त्याचे महत्त्व काय आहे, आणि आपण त्या वेळात जास्तीत जास्त ऊर्जा कशी प्राप्त करून घेऊन शकतो? ब्रह्म मुहूर्ताचा कालावधी?

सद्गुरु : आपण सूर्यास्त ते सूर्योदय हा कालावधी रात्र म्हणून गृहीत धरला, तर रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रम्ह मुहूर्ताचा काल – साधारणपणे रात्री 3.30 ते पहाटे 5.30 किंवा 6.00, किंवा सूर्योदयाच्या वेळेपर्यंत.

- Advertisement -

ब्रम्ह मुहूर्ताच्या काळामध्ये काय घडते?

पृथ्वीचे सूर्य आणि चंद्राबरोबरचे नाते अशा स्वरूपाचे आहे, की मानवी शरीरात या काळात काही विशिष्ट शारीरिक बदल घडून येतात. वैद्यकीय शास्त्राने असे देखील शोधून काढले आहे, की तुमच्या शरिरातील मलपदार्थ या काळात काही विशिष्ट गुणधर्म आढळून येतात, जे दिवसाच्या इतर कोणत्याही कालावधीमध्ये सापडत नाहीत.

याविषयी पुष्कळ संशोधन झालेले आहे. संपूर्ण शरीर विशिष्ट अशा अनुकूल वातावरणात असते, आणि नैसर्गिकरित्या पिनियल ग्रंथीमधून स्त्रवणारे मेलाटोनिन नावाचे रासायनिक द्रव्य तयार होत असते. आपल्याला याचा उपयोग करून घेता येतो, कारण ब्रम्ह मुहूर्ताच्या काळात पिनियल ग्रंथीमधून हा स्त्राव सर्वाधिक प्रमाणात होत असतो, ज्यामुळे आपल्या शरीर यंत्रणेला एक सहज स्थैर्य प्राप्त होऊ शकते.

आधुनिक वैद्यकीय शास्त्रात, मेलाटोनिनकडे मानसिक स्थितीचे नियंत्रक म्हणून बघितले जाते. अनेक वेळा मी तुम्हाला स्वतःमध्ये सहजता आणण्याबद्दल सांगितले आहे. सहजता आणणे म्हणजे तुमच्यात कुठलीही अस्थिरता राहिलेली नाही. तर ही सहजता ब्रम्ह मुहूर्ताच्या काळात नैसर्गिकरित्या साध्य होते. या वेळेत, आध्यात्मिक साधना केल्याने त्याचा सर्वाधिक फायदा मिळतो. ब्रम्ह मुहूर्त म्हणजे निर्मात्याचा काळ. आपण त्याकडे याप्रकारे पाहू शकतो: ही अशी वेळ आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने घडवू शकता. तुम्ही स्वतःच बा्रह्मण (निर्माता) बनू शकता, आणि स्वतःला, हवं त्याप्रकारे घडवू शकता.

एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या 50 अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. भारत सरकारतर्फे 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, जो एक असाधारण आणि प्रतिष्ठित सेवेसाठी, सर्वोच्च वार्षिक नागरी पुरस्कार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या