Thursday, May 2, 2024
Homeनाशिकविद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळा

विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळा

नाशिकरोड । प्रतिनिधी

विजेपासून होणारे दुर्दैवी अपघात टाळण्यासाठी महावितरणसह समाजातील सर्वच घटकांनी अधिक सतर्कतेने, सुरक्षितपणे विजेचा वापर करणे गरजेचे आहे. करोना या रोगाने बचावाकरिता ज्याप्रकारे दैनंदिन उपाययोजना करण्यास शिकविले त्याचप्रमाणे विद्युत अपघाता संदर्भात जागरूकता व शिस्त महत्वाची आहे, असे प्रतिपादन सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक सुंदर लटपटे यांनी केले.

- Advertisement -

विद्युत सुरक्षा सप्ताहनिमित्त मुख्य अभियंता रंजना पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर मंडळ, सुरक्षा व प्रशिक्षण केंद्र, एकलहरे आणि विद्युत निरीक्षक विभाग यांचे वतीने महावितरण कर्मचार्‍यांकरिता विद्युत सुरक्षा व उपाय या विषयावर कार्यशाळेचे आयोजन राजराजेश्वरी सभागृह जेलरोड, नाशिक येथे करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, प्रमुख अतिथी म्हणून सुरक्षा व प्रशिक्षण केंद्र एकलहरे येथील मुख्य महाव्यवस्थापक सुंदर लटपटे, पायाभूत आराखड्याचे अधिक्षक अभियंता संजय खंडारे, विद्युत निरीक्षक हेमंत गांगुर्डे, कार्यकारी अभियंते मणिकलाल तपासे, धनंजय दीक्षित, राजाराम डोंगरे उपस्थित होते.

विद्युत कर्मचार्‍यांनी यंत्रणेवर काम करताना सुरक्षा साधनांचा नियमित वापर केला पाहिजे, नाशिक मंडळात अपघात शून्यावर येतील यासाठी सामूहिकपणे सर्व घटकांनी कार्य केले पाहिजे, असे आवाहन अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले. यासोबतच अधिक्षक अभियंता संजय खंडारे, विद्युत निरीक्षक हेमंत गांगुर्डे यांनीह मार्गदर्शन केले. सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र राठौर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विद्युत कायदा, अपघाताची कारणे, उपाय, नियम आणि अनेक बाबींची माहिती दिली.

शेवटी सिन्नर येथील वरिष्ठ यंत्रचालक संदीप पाचंडे यांनी ‘चुकीला माफी नाही’ हे एकपात्री नाट्य सादर केले. या नाट्यातून जनमित्रांनी दैनंदिन कार्य करताना विद्युत अपघात टाळण्यासाठी काय केले पाहिजे यासंदर्भात जिवंत चित्रण उपस्थितांसमोर निर्माण केले. सदर नाटक समाजमाध्यमांवर असून त्याच्या ओटीटी लिंकचे प्रेषण सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शेवटी सुरक्षेची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.

कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता मणिकलाल तपासे यांनी तर संचालन सहाय्यक अभियंता विशाल निंबाळकर यांनी तर आभार अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र भांबर यांनी मानले. कार्यशाळेला अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र बहुसंख्येने सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या