Sunday, May 5, 2024
Homeनगरचोरी गेलेल्या 38 संरक्षक जाळ्या जप्त

चोरी गेलेल्या 38 संरक्षक जाळ्या जप्त

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

सामाजिक संघटनेच्या सलग श्रमदान करून स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आलेल्या सर्व वृक्षांच्या संरक्षक जाळ्या काही लोकांनी चोरून नेल्या होत्या. या बाबत सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी कारवाई करत 38 संरक्षक जाळ्या जप्त केल्या आहेत.

- Advertisement -

कर्जत शहर आणि परिसरात गेल्या 855 दिवसांपासून सलग श्रमदान करणार्‍या सर्व सामाजिक संघटनो स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबवत आहेत. संरक्षक जाळ्यासाठी नागरिकांच्या सहभागातून जाळ्या उपलब्ध करून त्या झाडांना लावण्यात आल्या होत्या. शहराजवळ जुना निमगाव रस्ता व ढेरेमळा रस्त्यावरील सुमारे 40 पेक्षा अधिक जाळ्या चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्याने सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्याने रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कर्जत पोलीस पथकाने जाळ्या व संशयितांचा शोध घेऊन जाळ्या हस्तगत केल्या. पर्यावरण संवर्धन सर्व सामाजिक संघटना करीत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी अशा जाळ्या चोरून त्यांना त्रास देणार्‍याची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सबंधीतांना दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या