Friday, May 3, 2024
Homeजळगावगिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

गिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

जळगाव – jalgaon

आज दि.१४ रोजी गिरना धरणात (Girna Dam) दुपार पर्यंत ८० टक्के जिवंत साठा होईल, वरून येणारा पुराचा येवा बघता व धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज दुपारनंतर गिरना धरणातून जास्तीचे पुराचे पाणी खाली गिरना नदीत (Girna River) सोडण्यात येणार आहे, तरी नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.

- Advertisement -

पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवा प्रमाणे कमी जास्त करण्यात येईल.साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग हा सुरवातीला २०००० क्यूसेक इतका राहील व तदनंतर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवानुसार विसर्ग १००००० क्यूसेक पर्यंत जाण्याची शक्यता आहे, तो येणाऱ्या येवानुसार वेळो वेळी कमी जास्त होऊ शकतो, तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी ही असे आवाहन (District Administration) जिल्हा प्रशासन, जळगाव व कार्यकारी अभियंता, (Irrigation Department) गिरना पाटबंधारे विभाग, जळगाव व यांच्या वतीने करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या