Thursday, May 2, 2024
Homeनगरसहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची निवडणुक बिनविरोध

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची निवडणुक बिनविरोध

कोपरगाव l Kopergoan

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची (Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Sahakari Sugar Factory) निवडणूक बिनविरोध झाली आहे.

- Advertisement -

या निवडणुकीत 21 जागेसाठी 21 अर्ज प्राप्त झाले. बिनविरोध निवडलेल्या संचालकामध्ये सर्वश्री ज्ञानेश्वर भगवंत परजणे, विश्वासराव नारायणराव महाले, बापूसाहेब संपतराव बारहाते (करंजी गट), बिपीन शंकरराव कोल्हे, विवेक बिपीनदादा कोल्हे, निलेश पथाजी देवकर (ब्राम्हणगांव गट), बाळासाहेब चंद्रभान वक्ते, रमेश रंगनाथ आभाळे, ज्ञानदेव पाराजी औताडे (जेऊरकुंभारी गट), आप्पासाहेब रभाजी दवंगे, राजेंद्र निवृत्ती कोळपे, ज्ञानेश्वर चिलीया होन (कोळपेवाडी गट), मनेष दिनकर गाडे, विलास एकनाथ वाबळे, विलास तुळशीराम माळी (वेळापुर गट), त्रंबकराव निवृत्ती सरोदे (सोसायटी मतदार संघ), सौ. उषा संजय औताडे, सौ. सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे (महिला राखीव मतदार संघ), रमेश दादा घोडेराव (अनुसुचित जाती मतदार संघ ), निवृत्ती कारभारी बनकर (इतरमागासवर्गीय मतदार संघ), सतिष सुभाषराव आव्हाड (विमुक्त भटक्या जाती जमाती मतदार संघ) यांचा समावेश आहे.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) उज्वला गाडेकर तर सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या