शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साई संस्थानने (Sai Santhan) देशभरात 50 लाख रुपये देऊन साई मंदिर (Sai Temple) उभारण्याच्या निर्णयाच्या विरोधात तसेच अन्य मागण्यांसह शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा अनिता जगताप व त्यांचे पती विजयराव जगताप गुरुवारी साई संस्थानच्या 4 नंबर प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. यातील काही मुख्य मागण्या महत्वाच्या असल्या तरी साई संस्थान शिर्डी (Sai Santhan Shirdi) शहराच्या विकास कामांना निधी देत नाही, अनेक वर्षांपासून भाविकांच्या मनोरंजनासाठी साई सुष्टी, थीमपार्क, स्विमिंगपूल, अद्ययावत व्यायामशाळा, सांस्कृतिक भवन, लेजर शो गार्डन व मनोरंजनाची साधने हे फक्त कागदावरच असून ते त्वरित विकसित करावे.
शिर्डीत नवीन इंटिग्रेटेड टर्मिनलसाठी 527 कोटी
तसेच साई संस्थानमधील काही विभागातील होणारे गैरव्यवहारावर नियंत्रण ठेऊन कडक कारवाई करावी. साई संस्थानच्या वार्षिक उत्पनाच्या तीस टक्के रक्कम ही शिर्डी (Shirdi) शहर विकास कामासाठी द्यावी, शिर्डी शहरात नगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गावर (Nagar Manmad Highway) अपघात होऊ नये म्हणून रस्ते क्रॉस करण्यासाठी स्कायवॉकची सुविधा निर्माण करावी, तसेच साई संस्थानकरिता आरक्षण असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन त्याचा योग्य तो मोबदला जमीन मालकाला देऊन सदर ठिकाणी असलेले आरक्षण विकसित करावे. महत्वाचे म्हणजे शिर्डी शहर विकास आराखड्यातील (Shirdi City Development Plans) अर्धवट असलेल्या रिंगरोडचे काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी जगताप दाम्पत्य आमरण उपोषणाला बसले आहे.
धरणे भरली.. भूजलपातळी खचली! समन्यायीची धडकी!!
या उपोषणाला सर्वपक्षीय ग्रामस्थांनी उपोषण स्थळावर जाऊन जगताप दाम्पत्याची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे. शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, सुजित गोंदकर यांच्यासह छत्रपती शासन व युवा शिर्डी ग्रामस्थ या मंडळातील अनेक पदाधिकार्यांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे.
आपली लढाई गुलामगिरी संपविण्यासाठी
आम्हाला तोंडी आश्वासन नको तर लेखी स्वरूपात आमच्या सर्व मागण्या मान्य करून तसे पत्र जोपर्यंत साई संस्थान प्रशासन देत नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण (Fasting Movement) सुरूच राहणार, अशी माहिती जगताप दाम्पत्यानी दिली आहे. या उपोषणाचे पडसाद राज्यभर उमटले असून अनेक महिला कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळावर भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान साई संस्थानच्या (Sai Santhan) सुरक्षा प्रशासनातील अधिकार्यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील अशी ठाम भूमिका अनिता जगताप यांनी घेतली आहे.
श्रीरामपुरात तरुणाची हत्या
शिर्डी सारख्या तिर्थस्थानी एका महिलेला उपोषण करण्याची वेळ ही दुर्दैवी आहे. त्यामुळे साई संस्थानने यावर गांभीर्याने विचार करून त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही हजारो कार्यकर्ते या उपोषणामध्ये साखळी पध्दतीने सहभागी होणार आहे.
– कैलासबापू कोते, शिर्डी
ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण अवघ्या 3 मिनिटांत!