Sunday, May 19, 2024
Homeधुळेविज कोसळून मुलगा गेला; वियोगाने मातृदिनी मातेचाही मृत्यू

विज कोसळून मुलगा गेला; वियोगाने मातृदिनी मातेचाही मृत्यू

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील विटाई येथे अत्यंत दुर्देवी घटना घडली. विज कोसळून मुलाचा मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसांनी पुत्र वियोगाने मातृदिनी मातेचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

विटाई येथे दि.6 मे रोजी विजांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यात शेतात काम करीत असतांना शेतकरी सुदामन भिला खैरनार (वय 50) यांच्या अंगावर विज कोसळली.

त्यात कर्ता तरूण मुलगा आपल्या डोळ्यादेखत गेला. त्याचा वयोवृद्ध आई- वडिलांना प्रचंड धक्का बसला.तरुण कर्ता मुलाचे असे अचानक जाण्याने दुःख जिव्हारी लागल्यामुळे मुलाला जाऊन चार दिवस होत नाहीत, तोच मातृदिनाच्या दिवशीच दि.9 मे रोजी पुत्रवियोगाने भागरथा भिला खैरनार यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुले आहेत. त्यात दगाजी खैरनार हा भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. तर भास्कर खैरनार हा शेती करतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या