Thursday, September 12, 2024
Homeनगरपावसाचा मोठा खंड पडल्याने सलाबतपूर परिसरातील पिके धोक्यात

पावसाचा मोठा खंड पडल्याने सलाबतपूर परिसरातील पिके धोक्यात

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा (Newasa) तालुक्यातील सलाबतपूर (Salabatpur) परिसरात पाऊस लांबल्याने पाण्याअभावी खरिप पिके (Kharif crops) धोक्यात आली असून लवकरात लवकर मुळा कालव्यातून आवर्तन (Mula Canal Avartan) सोडावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

- Advertisement -

यंदा पावसाळ्याचे अडीच महीने निघून गेले तरी परिसरात दमदार पावसाची हजेरी लागली नाही. रिपरिप पावसावरच शेतकर्‍यांनी खरिप पिकाची (Kharif crops) पेरणी केली. मध्यंतरी झालेल्या झिमझिम पावसावर शेतकर्‍यांनी कशीबशी पिके वाचवली. आणि आता नक्षत्र बदलत गेली तसे भरपूर पाऊस होईल असे वाटत असतानाच अचानक पावसाने गेल्या महिनाभरापासून उघडीप दिल्याने पिके पाण्याअभावी ताणून करपू लागली असल्याने शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात (Farmers in big financial crisis) सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अगोदरच सर्वसामान्य मजूर, व्यापारी, शेतकरी यांना करोना महामारीचा (Corona pandemic) सामना करताना नाकीनऊ आले आहे. करोनाच्या संकटाने अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत. त्यातून सावरत बळीराजा कसाबसा कामाला लागून मशागत करून पिके उभे करत असतानाच पुन्हा या पर्जन्य वक्रदृष्टीच्या आस्मानी संकटाला सामोरे जाण्याची वेळ आल्याने शेतकरी हबकून गेले आहेत. परिसरात अगोदरच दुबार पेरणी संकटाचा (Double sowing crisis) सामना करावा लागला. त्यामुळे शेतकर्‍यांचे बियाणे (Seeds), खत (Fertilizer), औषधांचा खर्च (cost of drugs) निघणे मुश्किल झाले असून शेतकर्‍यांची अर्थिक चणचण निर्माण होऊन शेतकरी कर्जबाजारी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मागील वर्षी पावसाने रोहिणी नक्षत्रापासूनच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली होती. मात्र पावसाचा जोर शेवटपर्यंत कायम राहिल्याने खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. विशेषतः कपाशी (Cotton), सोयबीन (Soybean), कांदा (Onion) या पिकांच्या नुकसानीची मोठी झळ शेतकर्‍यांना सोसावी लागली होती. त्यानंतर विहिर, कुपनलिकांना पाणी चांगले वाढले व धरणही भरले. पिकांना पाणी वेळेवर मिळेल म्हणून शेतकर्‍यांनी रब्बी पिके (Rabbi Crops) चांगली येतील म्हणून पुन्हा नव्या जोमाने काम सुरू केले मात्र पिके फुलोर्‍यात असताना व पाण्याची गरज असताना मुळाचे रोटेशन एक महिना लांबले. त्यामुळे मागील वर्षीच्या रब्बी पिकाची (Rabbi Crops) उत्पादन क्षमता चांगलीच घटली होती. मागील वर्षी पाऊस जास्त होऊनही शेतकर्‍यांसाठी अस्मानी संकट ठरले आणि यावेळाला पाऊस लांबला म्हणूनही आस्मानी संकट ठरत आहे. मात्र सध्याही शेतकर्‍यांची पिके पाण्याअभावी करपत असून शेतकर्‍यांचे डोळे सध्या आकाशाकडे लागले आहेत.

सध्या मुळा कालव्यात सतरा टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा (Water Storage) असून जर त्वरीत अवर्तन सोडले तर शेती पिकांची उत्पादनात घट होईल मात्र पिके वाचू शकतील. म्हणून लवकरात लवकर मुळा कालव्यातून अवर्तन (Mula Canal Avartan) सोडावे अशी मागणी सध्या सलाबतपूर परिसरातील शेतकरी करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या