Saturday, September 21, 2024
Homeनगरसलाबतपूरच्या नदीवरील पूल पाण्याखाली

सलाबतपूरच्या नदीवरील पूल पाण्याखाली

दोन गावांचा संपर्क तुटला

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

- Advertisement -

काल पासून सुरु असलेल्या पावसाने तालुक्यातील सलाबतपूर (Salabatpur) येथील नदीचा पूल पाण्याखाली (River Bridge Under Water) गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला तर आठवडा बाजारही विस्कळीत झाला आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रथमच पावसाचे पाणी पुलाच्या वरून फिरले आहे. त्यामुळे तब्बल दहा तास वाहतूक ठप्प झाली होती. तर शिरसगांव खडका रस्त्यावरही पुलाच्यावरुन पाणी गेल्याने याही रस्त्यावरही मोठ्याप्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.

काल सकाळपासूनच पावसाने सलाबतपूर (Salabatpur) परिसरात हजेरी लावली. रात्रभर पाऊस सुरु राहिल्याने नदीला (River) मोठ्याप्रमाणात पुलावरुन पाणी फिरण्याइतपत पाणी आले होते . दुपारी बारावाजेनंतर थोडं पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीत झाली. आठवडा बाजारासाठी येणार्‍या दुकानदारांची मोठी हेळसांड होताना दिसत होती. मात्र या पावसाने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खडका-शिरसगांव रस्त्यावरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी सध्या नागरीकांमधून होऊ लागली तर सलाबतपूर गोगलगाव रस्त्यावरील पुलाचे काँक्रिटीकरण करुन त्वरीत पुलाचे दोन्ही बाजुला कठडे बांधावे अशीही मागणी होऊ लागली आहे. या पुलावरुन मोठ्याप्रमाणात वाहतूक सुरु असते. तसेच शाळकरी मुलांनाही पायी चालताना मोठी कसरत पावसाळ्यात करावी लागत असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या