Sunday, May 5, 2024
Homeनगर5 टक्के विक्रीकर आकारणी विरोधात उच्च न्यायालयात याचिका

5 टक्के विक्रीकर आकारणी विरोधात उच्च न्यायालयात याचिका

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाराष्ट्र विदेशी दारू अधिनियम मधील तरतुदीनुसार मंजूर असणारे एफएल 3 परवानाधारक बिअर बार व परमिट रूम चालकांना विदेशी मद्यविक्री पोटी अतिरिक्त 5 टक्के विक्रीकर लावला जातो.

- Advertisement -

तथापी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये एफएल 3 अनुज्ञप्तीधारकांनी एमआरपी दराने मद्यविक्री करणे बंधनकारक होते. यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अनुज्ञप्तीधारकांनी एमआरपी दराने मद्यविक्री केली होती. मात्र पाच टक्के विक्रीकर आकारणी बेकायदेशीर आहे. याबाबत श्रीरामपूर तालुका परमिटरूम संघटनेचे अध्यक्ष रतनसिंह त्रिलोकसिंग सेठी यांनी औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात रिट याचिका दाखल केली.

शासनाने 19 मे 2020 रोजी अधिसूचना जारी केली व लॉकडाऊनच्या कार्यकाळात वाईनशॉप व बिअर शॉपीप्रमाणे एमआरपी दराने मद्यविक्री करण्यास अनुमती देण्यात आली. तथापि आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांच्या आदेशाने 19 मे 2020 मध्ये मद्य विक्रीवरील विक्रीकर अनुज्ञप्तीधारकांनी रितसर भरणे बंधनकारक राहील असे आदेशित केले होते.

एफएल 3 अनुज्ञप्तीधारकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत एमआरपी दराने मद्यविक्री केलेली आहे. तसेच एफएल 2 व एफएलबीआर 2 अनुज्ञप्तीप्रमाणे मद्यसाठा सीलबंद बाटलीतून विक्री केलेली आहे, म्हणून लॉकडाऊन कालावधीतील मद्य विक्रीसाठी 5 टक्के विक्री कर लागू करू नये, तसेच मद्य विक्रीसाठी 5 टक्के विक्रीकर बाबतचे आदेश रद्द करावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

याचिका श्रीरामपूर तालुका परमिट रूम संघटनेने अ‍ॅड. विक्रम उंदरे यांच्यामार्फत दाखल केली आहे. याचिकेमध्ये आयुक्त (विक्रीकर), आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), सचिव (अर्थ विभाग ) व सचिव ( राज्य उत्पादन शुल्क) यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. प्राथमिक सुनावणीअंती उच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी 9 मार्च 2021 रोजी होईल. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. विक्रम उंदरे तर शासनाच्यावतीने मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे हे काम पाहत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या