Sunday, May 19, 2024
Homeनगर'या' तालुक्यात लाळ्या, खुरकुताचा कहर

‘या’ तालुक्यात लाळ्या, खुरकुताचा कहर

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) जिरायत भागातील पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) येथील अनेक गायींना (Cow) लाळया खरकुताचा (Saliva And Kharkut) प्रादुर्भाव झाला असून जवळपास दहा लहान-मोठी जनावरे दगावली (Animals Death) आहेत. त्यामुळे अनेक पशुपालकांना (Pastoralist) आर्थिक फटका बसला आहे. पशुधन विभागाने (Livestock Department) तातडीने गावातील बाधित गोठ्यांना भेटी देवून उपचारासाठी आवश्यक औषधे व मदत (Medications and Help) द्यावी, अशी मागणी शेतकरी व पशु पालकांमधुन होत आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) हे गाव निळवंडेच्या (Nilwande) जिरायती टापुतील आहे. शाश्वत पाटपाण्याची सोय नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry and Dairying) केला जातो. गावात जवळपास चार हजारांवर लहान-मोठे पशुधन असून जवळपास पंधरा हजार लिटर दूध उत्पादन केले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून गावात लाळ्या खुरकुताच्या आजाराने थैमान घातले आहे. गावातील बहुतांश गोठ्यांमध्ये या आजाराचा संसर्ग झाला आहे.

या आजारामुळे गावातील शेतकर्‍याची जवळपास दहा लहान मोठी जनावरे दगावली आहेत. या आजारावरील औषधोपचारांचा खर्चही मोठा आहे. पशुधन आजारी पडल्याने दुध उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम झाला असून मोठ्या औषध उपचाराच्या खर्चाबरोबर दूध उत्पादनाचा फटकाही शेतकर्‍यांना बसत असल्याने शेतकर्‍यांना दुहेरी आर्थिक फटका बसत आहे. शासनाच्या पशुधन अधिकार्‍यांनी तातडीने गावातील बाधित गोठ्यांना भेटी द्याव्यात व उपचारासाठी आवश्यक औषधे द्यावीत तसेच ज्या शेतकर्‍यांचे पशुधन मृत झाले त्यांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी व पशु पालकांमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या