Friday, November 22, 2024
HomeराजकीयChhagan Bhujbal : "साहेब काहीतरी वेगळा निर्णय घ्या"; समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची भुजबळांकडे...

Chhagan Bhujbal : “साहेब काहीतरी वेगळा निर्णय घ्या”; समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची भुजबळांकडे मागणी

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. तशी नाराजी त्यांनी वेळोवेळी माध्यमांसमोर बोलून देखील दाखवली आहे. अशातच आज मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची (Samata Parishad) बैठक पार पडली. या बैठकीत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांसमोर लोकसभा आणि राज्यसभेत डावलल्यामुळे अन्याय होत असल्याचा भूमिका मांडत कुठेतरी वेगळा विचार करण्याची गरज आहे, अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे आता छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : अमोल किर्तीकरांचा पराभव निवडणूक यंत्रणेतील घोळामुळे; ठाकरे गटाचा आरोप

मुंबईच्या वांद्रे येथील एमईटी सेंटरमध्ये ही बैठक पार पडली.जवळपास चार ते साडेचार तास ही बैठक चालली.या बैठकीत समता परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे वेगळा निर्णय घेण्याची मागणी केली.आपल्यावर अन्याय झाला आहे, वेगळा निर्णय घ्या. ओबीसी आरक्षणाला धक्का देवून सरकार मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्याच्या तयारीत आहे. त्याबाबतीतही आपल्यावर अन्याय होत आहे. तुम्ही वेगळा विचार करा आणि निर्णय घ्या. आपल्यासाठी सध्या सर्वकाही ठिक नाही, हीच ती वेळ आहे, अशी मागणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

हे देखील वाचा : भाजपमध्ये मोठे फेरबदल; विधानसभेसाठी महाराष्ट्राच्या प्रभारीपदी ‘या’ नेत्यांची नियुक्ती

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ हे लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) वेळी नाशिकच्या जागेसाठी आग्रही होते.मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही.त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाल्यावर भुजबळ हे त्यांच्या प्रचारात देखील सक्रीय नव्हते. त्यामुळे भुजबळ नाराजी असल्याची चर्चा होती. यानंतर राज्यसभेच्या पोट निवडणुकीसाठी देखील भुजबळ इच्छुक होते. परंतु, त्यांना राज्यसभेची संधी न मिळता सुनेत्रा पवार यांना मिळाली.त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली.या सर्व घडामोडींनंतर आज समता परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत छगन भुजबळ यांची बैठक झाली.या बैठकीत भुजबळ यांनी वेगळा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली.

हे देखील वाचा : “लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाकडे…”; पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला घरचा आहेर

बैठकीनंतर छगन भुजबळ काय म्हणाले?

दरम्यान,बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “तुम्ही रोज भेटता, मी म्हणालो का तुम्हाला की मी नाराज आहे म्हणून? अरे राजकारणात, पक्षामध्ये काही गोष्टी मिळतात तर काही गोष्टी मिळत नाहीत. ते पाहून पुढे जायचं असतं, आज नाही तर उद्या होतं. आपण काम करत राहायचं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या