Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याकसबापेठ, चिंचवड निवडणूक : संभाजी ब्रिगेडचा मोठा निर्णय, मविआचा मार्ग सुकर?

कसबापेठ, चिंचवड निवडणूक : संभाजी ब्रिगेडचा मोठा निर्णय, मविआचा मार्ग सुकर?

पुणे | Pune

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. महाविकास आघाडी आणि भाजपाने आपले उमेदवारी जाहीर केले असून, २६ फेब्रुवारीला या दोन्ही जागेसाठी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज कसबापेठ, चिंचवड निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

- Advertisement -

यादरम्यान मविआसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून संभाजी ब्रिगेडने कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागांसाठीच्या पोटनिवडणूकीतून माघार घेतली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार सचिन अहिर यांच्या शिष्टाईनंतर अखेर संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यास होकार दर्शविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.

कसबापेठमधून संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते आणि चिंचवडमधून प्रवीण कदम उभे होते. या दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचारही सुरू केला होता. संभाजी ब्रिगेड हा ठाकरे गटाचा मित्र पक्ष असतानाही त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आघाडीचं टेन्शन वाढलं होतं.

विधानसभेच्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाकडून आनंद दवे आणि कसब्यात अविनाश मोहिते मैदानात आहेत.

मात्र, आता संभाजी ब्रिगेडने या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे रिंगणात आहे. मात्र, या ठिकाणी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे सेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या