मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणूक न लढणाऱ्या छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता त्यांच्या स्वराज संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता मिळाली. याबाबतची माहिती स्वत संभाजीराजेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून संभाजीराजे छत्रपतींच्या संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’म्हणून मान्यता दिली आहे. तसेच निवडणूक लढवण्यासाठी त्यांना “सप्त किरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह देखील मिळाले आहे. याबाबतची माहिती संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.