Tuesday, March 25, 2025
Homeनगरपोहण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्यू

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

सामनगाव (ता. शेवगाव) (Samngav) येथील ढोरानदी वरील बंधार्‍यात पोहण्यासाठी (Swiming) गेलेल्या युवकाचे पाण्यात बुडून निधन (Teacher Drowning Death) झाले आहे. सामनगाव येथील रहिवाशी असलेले दिपक झाडे (वय 48) असे त्यांचे नाव असून ते महालक्ष्मी हिवरे (ता. नेवासा) येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते.

- Advertisement -

याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यांच्यावर सामनगाव (ता. शेवगाव) येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. याबाबत माहिती अशी, दिपक झाडे हे गुरुवार (दि.24) रोजी सकाळी 7 च्या सुमारास सामनगाव येथील ढोरानदीवरील (Dhora River) बंधार्‍यावर मित्रांसह पोहण्यासाठी गेले होते. बंधार्‍यानजिक पोहत असतांना ते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. इतरांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने ते पाण्यात बुडाले.

परिसरातील युवकांनी त्यांना वर काढून शेवगाव (Shevgav) येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यांच्यावर दुपारी सामनगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...