छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. यात बसने पेट घेतल्याने २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता समृद्धी महामार्गावर आणखी एका खासगी बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या खासगी बसने समोरून जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील २० प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे.
Accident News : भीषण अपघात! भरधाव पिकअपची पाच वाहनांना धडक, दोघे गंभीर जखमी
हा अपघात मंगळवारी रात्रीच्या सुमारास छत्रपतीसंभाजीनगर शहराजवळील सावंगी परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, खुराणा ट्रॅव्हल्सची खासगी बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. बस छत्रपती संभाजीनगर शहरातील सावंगी परिसरात आली असता, लोखंडी सळया वाहून नेणाऱ्या ट्रकला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की बसच्या कॅबिनचा चक्काचूर झाला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील २० प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यातील ११ प्रवाशांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
अक्षय कुमार भगवान शंकराच्या रूपात! OMG 2 टीझर पाहिलात?