Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याअभियांत्रिकी पूर्व परीक्षेसाठी नाशिक केंद्राला मंजुरी

अभियांत्रिकी पूर्व परीक्षेसाठी नाशिक केंद्राला मंजुरी

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत राज्यभरात घेतल्या जाणार्‍या परिक्षांसाठी नाशिक हे परिक्षा केंद्र असले तरी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षेसाठी नाशिक येथे केंद्र नव्हते.

- Advertisement -

यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरिक्षेसाठी पुढील वर्षांपासून नाशिक येथे केंद्र मंजूर करण्यात आल्याचे पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी खा. गोडसे यांना दिले आहे. अभियांत्रिकी पूर्वपरिक्षासाठी लोकसेवा आयोगाने नाशिक येथील केंद्राला मंजुरी दिल्याने उत्तर महाराष्ट्रातील परिक्षार्थींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरिक्षेसाठी नाशिक केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या अनेक शिष्टमंडळांनी खा. गोडसे यांची भेट घेवून केली होती. विद्यार्थ्यांच्या व्यथा समजून घेतल्यानंतर सदर परिक्षेसाठी नाशिक केंद्र व्हावे, यासाठी मागील चार महिन्यांपासून खा. गोडसे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रशासनाची मुंबई कार्यालयात भेट घेतली. यावेळी आयोग प्रशासनाने लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही खा. गोडसे यांना दिली होती.

उत्तर महाराष्ट्रात परिक्षा केंद्र नसल्यामुळे पाच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना होत असल्याने खा. हेमंत गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याचे लक्षात आल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परिक्षा केंद्रासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला. पुढील परिक्षेच्या वेळेपासून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षेसाठी नाशिक येथे केंद्र मंजूर करण्यात आल्याचा निर्णय शुक्रवारी (दि.27) एका पत्राद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव अताडे यांनी कळविले आहे. या केंद्राच्या सोयीमुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार आदी जिल्ह्यातवील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. केंद्र मंजुरीची माहिती मिळताच उत्तर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षार्थींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या