Sunday, May 5, 2024
Homeनगरवाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाळकी (ता. नगर) ओढ्यातून वाळू उपसा करणार्‍या एका ट्रॅक्टरवर नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली.

- Advertisement -

या कारवाईत एक ब्रास वाळू व विना नंबरचा ट्रॅक्टर, ट्राली असा 8 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक पंडीत तुकाराम जुंदरे (वय 26) व मालक दिनेश सखाराम कासार (वय 25 दोघे रा. वाळकी ता. नगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

वाळकीच्या ओढ्यातून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बी.बी. धुमाळ, पोलीस शिपाई जाधव यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस नाईक कदम करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या