Sunday, April 27, 2025
Homeनगरसंगमनेरातील 'बेवफा' प्रकारानंतर उडाला गोंधळ

संगमनेरातील ‘बेवफा’ प्रकारानंतर उडाला गोंधळ

संगमनेर । शहर प्रतिनिधी

संगमनेर शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीच्या बाकावर काही विद्यार्थ्यांनी ‘बेवफा’ लिहिल्याने मोठा राडा झाला.

- Advertisement -

संगमनेर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या महाविद्यालयात गुरुवारी एका तरुणीच्या बाकावर ‘बेवफा’ असे लिहिल्याचे आढळल्याने गोंधळ उडाला. यानंतर महाविद्यालय प्रशासनाने सदर मुलीच्या आई वडिलांना बोलावले.

हे देखील वाचा :  उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जाऊन धडकल्याने भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

दरम्यान या तरुणीची बिघडल्याने तिला दवाखान्यात हलविण्यात आले. याठिकाणी तिच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. ‘बेवफा’ लिहिणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होते.

वादाची माहिती समजताच संबंधितांचा नातलग असलेला एक पोलीस कर्मचारी तेथे आला. हा पोलीस शहराबाहेरील पोलीस ठाण्यात सेवेत असताना त्याला येथे कोणी बोलावले असा प्रश्न उपस्थित झाल्याने वाद वाढला. त्यानेही आपला रुबाब दाखवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...