Friday, May 3, 2024
Homeनगरसंगमनेर तालुक्यातील 16 टॉवर्स सील

संगमनेर तालुक्यातील 16 टॉवर्स सील

संगमनेर |शहर प्रतिनिधी|Sangmner

वेळेत महसूल जमा न केल्याने तालुक्यातील विविध कंपन्यांचे 16 टॉवर्स महसूल अधिकार्‍यांनी सिल केले आहेत.

- Advertisement -

कर न भरणार्‍या 80 टॉवर्स चालकांना तब्बल 2 कोटी 92 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

संगमनेर तालुक्यात विविध कंपन्यांचे एकूण 147 टॉवर्स आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी हे टॉवर्स कार्यरत आहे. दरवर्षी संबंधित कंपन्यांना शासनाकडे महसूल जमा करावा लागतो. मात्र अनेक कंपन्यांनी शासनाचा महसूल जमा केला नसल्याचे उघडकीस आले. हा महसूल जमा करावा अशा सूचना तहसिदारांनी संबंधित कंपन्यांना दिले होते.

मात्र तरीही त्यांनी हा कर शासनाकडे जमा न केल्याने महसूल अधिकार्‍यांनी सोमवारी ही कारवाई केली. या कारवाईत स्वत: तहसीलदार अमोल निकम, मंडलाधिकारी व कामगार तलाठी सहभागी झाले होते. 147 पैकी 67 टॉवर्सचे धनादेश प्राप्त झाले आहे. इतर कंपन्यांना प्रति टॉवरमागे 36 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या कंपन्यांना सोमवारपर्यंत पैसे भरण्याची मुदत दिली आहे. मुदतीत पैसे जमा न झाल्यास या टॉवर्सनांही सिल लावण्यात येणार आहे. महसूल खात्याने कारवाई केल्याने टॉवर चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या