Friday, May 3, 2024
Homeनगरसंग्राम कोते यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी निवड

संग्राम कोते यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी निवड

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष संग्राम कोते पाटील (Former President of Youth Congress Sangram Kote Patil) यांची वर्णी जयंत पाटील (Jayant Patil) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी पक्षाच्या फादर बॉडीमध्ये (NCP Father Body) लावून सचिवपदी (Secretary) स्थान दिले असून त्यांच्या नियुक्तीबद्दल शिर्डीसह (Shirdi) राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

- Advertisement -

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षांमध्ये काम करत असतांंना कोते यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केले होते. याबाबत पक्षश्रेष्ठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वतः अनेक भाषणांमध्ये दखल घेतली होती. श्री कोते उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे अत्यंत निकटवर्तीय असून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांचे ते भाचे आहेत. वन बूथ टेन युथ ही संकल्पना श्री कोते यांनी राज्यभर राबविली.केंद्र व राज्य सरकारच्या यांच्याविरुद्ध शंभराहून अधिक ताकतीचे मोर्चे सबंध महाराष्ट्रामध्ये युवकचे अध्यक्ष असतांंना काढले होते. गांंव व महाविद्यालय तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा या उपक्रमाअंतर्गत तीन हजाराहून अधिक शाखा विद्यार्थी काँग्रेसच्या अन्य राज्यात अनावरण केल्या.

हे सगळं सुरू असतांंना कोते यांना मध्यंतरी तब्येतीचा काही त्रास झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तो पक्षासाठी धक्कादायक होता. कारण कोते यांनी खूप मजबूत पकड युवक विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून तयार करून महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात काम उभे करत असताना राज्याचे सात दौरे करून साडेतीन लाखांहून अधिक किलोमीटर प्रवास त्यांनी केला. आता पक्षाने मुख्य कार्यकारणीमध्ये सचिवपदी नियुक्ती करून त्यांच्या मेहनतीला साद दिली आहे. नवनवीन उपक्रम राबवून अनोख्या पद्धतीने पक्ष संघटना बळकट करण्याचे कसब त्यांच्याकडे असून ह्या संधीचाही ते पक्षाला फायदा करून देतील अशी चर्चा राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्र राज्यात रंगली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या