मुंबई | Mumbai
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या कवितेचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही. शिंदे गटातील नेते, राहुल कनाल यांनी कुणाल कामराच्या युट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी टोलेबाजी करत सुनावले आहे.
कुणाल कामरा याच्या कवितेने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्याने शिवसेना फुटीवर केलेले भाष्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे. कुणाल कामरा याच्याविरोधात हक्कभंग आणण्याची तयारी करण्यात येत आहे.
शिंदे गटाचे नेते कोणतीही मागणी करू शकतात. शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही. ते रेड्याचे दूध काढू शकतात आणि ते बैलाचे दूध काढू शकतात, अशी बोचरी टीका राऊतांनी केली. देशात काही प्रमाणात स्वातंत्र्य टिकवले आहे. तुमच्यावर टिप्पणी केली म्हणून त्याचे चॅनेल बंद करायचे, त्याला उलटे टाकून टायरात घालून मारायचे. उद्या सरकार बदलले आणि विरोधातील कार्यकर्त्यांनी हीच भूमिका घेतली, तर देशात अराजकता माजेल.”
अमित शहांचे छत्र डोक्यावर आहे तोपर्यंत
हा देश खूप मोठा आहे. पण शिंदे गटाला त्यांचा देश अमित शहा यांच्या पलिकडे दिसत नाही, असा चिमटा राऊतांनी काढला. जोपर्यंत अमित शहा यांचे छत्र त्यांच्या डोक्यावर आहे, तोपर्यंत त्यांची अशी भाषा चालेल. पण रामकृष्ण ही गेले, तसे मोदी-शहा पण जातील-येतील इतके लक्षात ठेवा. इतकाच इशारा शिंदे गटाने लक्षात ठेवावा असे राऊत म्हणाले. देशात कायद्याचे राज्य आहे. शिंदे गटाने कायद्याच्या मदतीने कारवाई करावी असे ते राऊत म्हणाले.
तर बाळासाहेबांनी चापकाने फोडले असते
“ठाकरे कुटुंबीयांवर चिखलफेक करणारे काही लोक आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचारवाहक आहोत असे म्हणतात, त्यांना असे राजकारण करताना लाज वाटली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय पुरुष आहेत, त्यांचा फोटो कुणीही वापरू शकते. शिंदे गट देखील बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरतो. मात्र, बाळासाहेब जर असते तर त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चापकाने फोडले असते,” असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा