Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, गद्दारांच्या...

राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, गद्दारांच्या…

मुंबई | Mumbai

काल मुंबईतील (Mumbai) शिवडी न्हावा शेवा पारबंदर प्रकल्पाच्या मुख्य भूमीशी प्रत्यक्ष जोडणीचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गाडीचे सारथ्य केले. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे…

- Advertisement -

Hingoli Accident News : ट्रकचा भीषण अपघात; १५० मेंढ्यांसह ५ जणांचा मृत्यू

२१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली. तसेच उद्धव ठाकरेंनी २९ जून २०२२ ला राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले असून सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या ४० आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जात आहे.

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलीच अव्वल, नाशिकचा निकाल किती?

त्यानंतर आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गद्दारांच्या गाड्या चालवण्याची वेळ आली आहे असे म्हटले आहे. तसेच काल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या टीकेला देखील राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बाळासाहेब शिकण्याची आमच्यावर वाईट वेळ आलेली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावे. बाळासाहेबांनी बेईमानांना कधीच मांडीवर घेतले नाही. गद्दारांना हाकलून द्या असे ते म्हणायचे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे गद्दारांच्या गाड्या चालवत आहेत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

Nashik : शिवशाही बस चालकाची बसमध्येच आत्महत्या

तसेच नवीन संसद भवनाच्या (Parliament House) उद्घाटनाच्या कार्यक्रमावर देखील राऊतांनी भाष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रपती आणि संसद मिळून लोकशाही आणि पुढच्या प्रक्रिया सुरू होतात. मात्र आपण एक पॉलिटिकल इव्हेंट म्हणून राजकीय उत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधानांनी उद्घाटन करावे, असे भाजपने ठरवले आहे. ते चुकीचे आहे. आमचा मुद्दा संविधानिक आणि नैतिकतेचा आहे. नवीन संसद उभारला आनंद आहे. त्याचे उद्घाटन होते आहे, याचा आनंदच आहे. मात्र या निमित्ताने देशाच्या संविधानावरती हल्ला होत आहे याला आमचा विरोध आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या