मुंबई | Mumbai
लोकसभेनंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections) पडघम वाजू लागले आहेत.लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Election) विजयानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर न ठेवून लढवणार असल्याचे ठरले होते.मात्र, अशातच आता महाविकास आघाडीने एकत्रितपणे घेतलेल्या निर्णयाच्या विपरीत वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
हे देखील वाचा : संपादकीय : २७ जून २०२४ – जलसंवर्धनाचा वारसाच पुढे चालवणे हिताचे
यावेळी बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, “आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणे हा धोका आहे. या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे काम पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून झालेले आहे. अर्थातच तिघांचीही ताकद एकत्र होती. मात्र, बिनचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही, हे अजिबात चालणार नाही.लोक स्वीकारणार नाहीत,लोकांना चेहरा द्यावाच लागेल, असे म्हणत राऊत यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा”, अशी अप्रत्यक्ष मागणी केली आहे.
हे देखील वाचा : नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार
दरम्यान,विधानसभा निवडणुकीला अवघे १०० दिवस बाकी असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत बिघाडी करणारे विधान केले आहे.त्यामुळे महाविकास आघाडीत मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) इतर घटक पक्ष संजय राऊत यांच्या या विधानावर काय भाष्य करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वारकऱ्यांनी दिले आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण
हे तर अल्पमताचे सरकार
नव्या संसदेची आज रीतसर सुरुवात होत राष्ट्रपतींच्या भाषणाने होईल. अल्पमताचे सरकार भाषणातून किती पाठ थोपटून घेत आहे, किती थापा मारते ते पहावे लागेल.यावेळची लोकसभा ही पूर्णपणे वेगळी आहे. आणि त्याचे प्रतिबिंब हे राज्यसभेत सुद्धा पाहायला मिळेल. भाजपने बहुमत गमावले आहे. कुबड्यांवरचे पंतप्रधान आणि त्यांचे कॅबिनेट हे आपल्याला पाहावे लागत आहे.सुंभ जळाला तरी पीळ जात नाही. आम्ही अजूनही आहोत, हे दाखवण्याचा (सरकारकडून) प्रयत्न नक्की होईल. पण हा पीळ उतरवण्याचे काम आम्ही करू. हे काम विरोधी पक्षनेते, राहुल गांधी हे नक्की करतील याची आम्हाला खात्री आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा