Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: मोठी बातमी! खासदार संजय राऊतांच्या तब्येतीत गंभीर बिघाड; सार्वजनिक ठिकाणी...

Sanjay Raut: मोठी बातमी! खासदार संजय राऊतांच्या तब्येतीत गंभीर बिघाड; सार्वजनिक ठिकाणी जाण्यावर निर्बंध, पत्र लिहीत दिली माहिती…

मुंबई | Mumbai
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या तब्येतीविषयी मोठी बातमी समोर येत आहे. संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता थेट नवीन वर्षात सार्वजनिक जीवनात पुनरागमन करतील. याबाबतचे पत्र त्यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट केले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. संजय राऊत यांनी काहीवेळापूर्वीच आपल्या एक्स अकाऊंटवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये संजय राऊत यांनी प्रकृतीची गंभीर समस्या उद्भवल्याचे नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी झाली होती. त्यावेळी संजय राऊत यांच्या प्रकृतीत इतका गंभीर बिघाड होईल, असे कोणालाही वाटले नव्हते.

- Advertisement -

वैद्यकीय सल्ल्यानुसार निर्बंध घालण्यात आले
वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणे किंवा गर्दीमध्ये मिसळणे यावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. कार्यकर्त्यांना त्यांनी यासंदर्भात आवाहन करणारे पत्र लिहिले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संजय राऊत सत्याचा मोर्चामध्ये सहभागी होणार की नाही? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

YouTube video player

संजय राऊतांनी पत्रात काय म्हंटले?
जय महाराष्ट्र
‘आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि भरभरून प्रेम दिलं. मात्र, अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलंय. सध्या उपचार सुरू आहेत. या आजारातून मी लवकरच बरा होईन. वैद्यकीय सल्ल्यानुसार, मला बाहेर जाणे किंवा गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहे. या गोष्टीला आता नाईलाज आहे. मला खात्री आहे मी लवकर ठणठणीत बरा होईल. नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या भेटीस येईन’.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...