Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्या“राज ठाकरेंनी पत्र लिहिलं असलं तरी, मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असलं तरी निवडणुका...”;...

“राज ठाकरेंनी पत्र लिहिलं असलं तरी, मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असलं तरी निवडणुका…”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | Mumbai

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपने दोन उमेदवार जाहीर केले आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.

- Advertisement -

पण, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना फोन केला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मविआला साद घातली आहे.

दरम्यान यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी जरी आवाहन केलं असेल किंवा राज ठाकरेंनी जरी पत्र लिहलं असेल तरीही कसबा आणि चिंचवडच्या निवडणुका होतीलच, असे संजय राऊत म्हणाले.

‘कसबा-चिंचवड’ पोटनिवडणुकांचं चित्र पालटणार?; राज ठाकरें ‘मविआ’ला पत्र, ‘त्या’ निवडणुकीची करून दिली आठवण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आवाहन चांगलं आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहे. पण या राज्यात घाणेरडं राजकारण कोणी केलं? येथील वातावरण कोणी गढूळ केलं? महाराष्ट्रात सुडाचं राजकारण कोणी सुरू केलं? यावरही चिंतन व्हायला हवं, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपने उमेदवार जाहीर केले. काँग्रेसनेही जाहीर केले आहेत. चिंचवडचा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. चिंचवडसाठी शिवसेना अजूनही इच्छुक आहे. नाही असं नाही. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निर्णय घेऊ. दोन्ही मतदारसंघातील वातावरण ज्या प्रकारचं आहे. ते वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नाही. विधान परिषद निवडणुकीने ते दाखवून दिलं. जनतेच्या मनात काय आहे हे स्पष्ट झालंय, असं ते म्हणाले.

राहुरी, श्रीरामपूरच्या आकाशातून रात्रीच्या अंधारात नेमकं काय गेलं?…. नागरिकांनी अनुभवले अनोखे दृष्य

निवडणूक बिनविरोध करायची आहे तर भाजप का लढवत आहेत? त्यांनी मागे हटाव. पदवीधर निवडणुकीत जे निकाल लागले त्यामुळे सरकार घाबरले आहे. त्यामुळे निवडणूक टाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सरकारला वाटतं ही निवडणूक होऊ नये. निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागेल. ते सत्य आहे. दोन्ही मतदारसंघातील निकाल वेगळा लागू शकतो. असं एक जनमानस आम्हाला स्पष्ट दिसतंय. म्हणून या निवडणुका होतील. लोकांची इच्छा आहे. आम्ही सर्व्हे केला. आम्हाला आमच्या भूमिका लोकांना स्पष्ट करायच्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

चिंचवडमधून अश्विनी जगताप भाजपच्या अधिकृत उमेदवार

अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहे. सातारा हे त्यांचं मुळ गाव आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लेक आहेत. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचं जाळं पसरवलं आहे. महिलांच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. लक्ष्मण जगताप निवडणुकीस उभे असताना त्या प्रचारात सक्रीय असायच्या. मात्र निवडणूक त्या पहिल्यांदाच लढवत आहेत.

एका लग्नाची जगावेगळी गोष्ट! नवरी पळाली भुर्रर्र…नवरा पाहतच राहिला

कसब्यातून हेमंत रासने भाजपचे अधिकृत उमेदवार

हेमंत रासने हे पुणे महानगर पालिकेचे भाजपचे नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेचे भाजपचे ते दोन टर्म स्थायी समिती अध्यक्ष होते. पुण्याच्या विकासासाठी त्याचं मोठं योगदान आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या