Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: "नरेंद्र मोदी यांच्यासोबतही आम्ही चांगले काम केले पण"…; शिवसेना-भाजप युतीवर...

Sanjay Raut: “नरेंद्र मोदी यांच्यासोबतही आम्ही चांगले काम केले पण”…; शिवसेना-भाजप युतीवर संजय राऊतांचे विधान

मुंबई | Mumbai
चंद्रकांत पाटील हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत. ते शिवसेना-भाजपा युतीचे समर्थक राहिलेत. जी जुनी पिढी एकत्र होती त्यात चंद्रकांत पाटलांसारखे नेते होते. कदाचित भाजपात जे हौसे नवसे आणि गवसेआलेत त्यांना २५ वर्षातील आमच्या युतीचे महत्त्व कळणार नाही. नरेंद्र मोदी यांच्यासोबतही आम्ही चांगले काम केले पण दिल्लीत अमित शाह यांचा उदय झाल्यानंतर शिवसेना-भाजपात वितुष्ट आले असे सांगत खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-भाजपा युती तुटण्याला शाह यांनाच जबाबदार धरले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप यांच्यात निर्माण झालेली दरी कमी होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपसंदर्भात नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात एका लग्न समारंभात चर्चा झाली. त्या चर्चेनंतर पुन्हा युतीची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी मार्मिक उत्तर दिले आहे.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. त्यांच्यासारख्या भावना आमच्या पक्षातील नेत्यांमध्येही असू शकतात. आम्ही महाविकास आघाडीत गेलो त्याला कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीतील काही लोकांचा हट्ट आहे. २५ वर्षाची आमची युती ज्या कारणांसाठी तुटली ती कारणे पाहिली तर आमची भूमिका योग्य होती. जे आम्ही मागत होतो, जो आमचा हक्क होता तो तुम्ही आमचा पक्ष फोडून एकनाथ शिंदेना दिला. आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्रि‍पदाचा दावा आणि हक्क तुम्ही एकनाथ शिंदेंना दिला असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी युती तुटण्यास अमित शाह जबाबदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, दिल्लीत अमित शाह यांचा उदय झाल्यानंतर शिवसेना-भाजपमधील दरी वाढली. आम्ही मविआत भाजपमधील काही लोकांच्या हट्टामुळे गेलो. त्या लोकांमुळे २५ वर्षांची युती तुटली. आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्रीपदाचा दावा तुम्ही एकनाथ शिंदे यांना दिला. आम्ही तेव्हा हिच मागणी केली होती. परंतु अमित शाह यांनी ही ती मागणी नाकारली. कारण त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडायची होती. आता पुन्हा अनेक लोकांना भाजप-शिवसेना युती होऊ शकते, असे वाटत होते. आता येत्या काळात काही घडमोडी घडणार आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेना उबाठामधील अनेक लोकांना युती व्हावी, असे वाटते.

आमचा पक्ष फोडल्यावर जे आम्ही मागत होतो, जो आमचा हक्क होता तो तुम्ही एकनाथ शिंदेंना दिला. जेव्हा आम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती, तेव्हा अमित शहा यांनी ती मागणी नाकारली. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती, त्यांचे आर्थिक हितसंबंध मुंबईत गुंतले होते. त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवायची होती आणि आजही एकनाथ शिंदे यांचा वापर ते त्यासाठीच करत आहेत, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, मी याक्षणी युतीबाबत उत्तर देऊ शकत नाही. पुढच्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आम्ही सध्या Wait and Watch या भूमिकेत आहोत. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपासोबत किती काळ राहील आणि किती वेळ टिकवला जाईल याबाबत माझ्या मनात साशंकता आहे. एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेप्रमाणे फोडला जाईल. त्यांचा गट विस्कळीत होईल. आज केवळ सत्ता आणि पैसा या जोरावर ते एकत्र आहेत बाकी त्यांच्याकडे काही नाही असंही संजय राऊतांनी दावा केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...