Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : "... तर त्यासाठी भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार"; संजय राऊतांचा...

Sanjay Raut : “… तर त्यासाठी भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai 

- Advertisement -

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार (Firing) केला. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू (Death of Tourists) झाला आहे. लोकांना धर्म विचारुन त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर आज माध्यमांशी बोलतांना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आऱोप केला आहे.

संजय राऊत (Sanjy Raut) यांना माध्यम प्रतिनिधींनी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या (Murder) करताना त्यांना धर्म विचारून मग गोळ्या झाडल्या होत्या,असे विचारले असता ते म्हणाले की, “जर पर्यटकांची हत्या करताना त्यांना धर्म विचारला गेला असेल तर त्यासाठीही भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार आहे. ज्या प्रकारे आपल्या देशात द्वेषाचं राजकारण सुरू आहे, ती कधी ना कधी उलटणार आहे. पहलागममध्ये जे काही घडलंय, त्यासाठी भाजपाने निर्माण केलेली घाण, द्वेषाचं राजकारण जबाबदार आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, “अमित शाह (Amit Shah) हे अपयशी गृहमंत्री आहेत. मीच नाही तर संपूर्ण देश त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. अमित शाह हे अपशकुनी आणि अपयशी गृहमंत्री आहेत. त्यांना एक मिनिटही पदावर राहण्याचा अधिकार नाही आहे. ते दिवसभर राजकारण, कटकारस्थान करत असतात. हा पक्ष तोडायचा, तो पक्ष तोडायचा, हे चालत असतान तिकडे संपूर्ण देश तुटत आहे. आमची माणसं मारली जात आहेत आणि हे लोक राजकारणात गुंतलेले आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली.

पुढे ते म्हणाले की,”काल पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आमचे देशभरातील पर्यटक मारले गेले. त्यात महाराष्ट्रामधील सहा जणांचा समावेश आहे. काश्मीरवर केंद्राचं पूर्ण नियंत्रण राहावं यासाठी कलम ३७० हटवलं. जम्मू -काश्मीरला केंद्रशासित बनवलं. त्यामुळे काल पहलगाम येथे जो हल्ला झाला, त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची नाही तर केंद्र सरकारची आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

तसेच “मोदी (Modi) म्हणाले होते की, दहशतवादमुक्त जम्मू-काश्मीर बनवू. जम्मू-काश्मीर पर्यटकांसाठी स्वर्ग बनवू, लोक स्वर्गात गेले. तुम्ही त्यांना स्वर्गात पाठवले. उद्या हे लोक २७ जणांच्या घरी जाऊन सांगतील की, नंदनवनात त्यांचा मृत्यू झाला ते स्वर्गात गेले,जसे कुंभमेळ्याच्यावेळी सांगितले की, जे मेले त्यांना मोक्ष मिळाला. मेलेले लोक गोमूत्र पाजून जिवंत होणार नाहीत. फडणवीस म्हणतात करारा जबाब देंगे, गोमूत्र शिंपडून जिवंत करणार का?” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...