नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात झाला आहे. अजित पवारांचा मृत्यू अशा एका अपघातामध्ये झालेला आहे, तो नक्की कसा घडला आणि का घडला? हे रहस्य समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचारावर भाष्य करत होते. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपाने कुत्र्यांच्या नसबंदीत कसे पैसे खाल्ले हे अजित पवार यांना माहिती होते. अजित पवार बरेच वर्ष अर्थमंत्री असल्याने भाजपाच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना सर्व माहिती होती. ते सर्व कागदपत्रे आपल्याजवळच ठेवत. लोकसभेमध्ये राहुल गांधी यांना बोलू दिले नाही. अजित पवार यांचा मृत्यू रहस्यमय आहे. दादांच्या अपघाताचे रहस्य लोकांना कळायला हवे. अजितदादांचे जुनी विधाने बघितली तर ते म्हणाले की, मी परत येण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले होते. अजित पवार यांच्या निधनाने आजही महाराष्ट्र धक्क्यात आहे.” असे सूचक विधान त्यांनी केले.
अजित पवार हे सर्व शक्यतो आपल्या जवळच ठेवत होते, त्यादिवशी देखील त्यांच्यासोबत काही डॉक्युमेंट पुरावे असावेत, पण अर्ध्या तासातच त्यांचं विमान उडालं आणि अपघात झाला, याच्यावरती स्पष्टीकरण द्यायचं का? भाजप कशाला स्पष्टीकरण देते, याबाबत चौकशी समिती नेमावी आणि ती न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमावी, हेच मी म्हणालो बाकी मी काय म्हणालो, असंही पुढे राऊत म्हणालेत.
India-US Trade Deal: टॅरिफ कमी होताच भारतीय शेअर बाजारात हिरवाई; सेन्सेक्स, निफ्टीचा ‘बुल’ रन
माझी चूक एवढीच की मी सगळ्यात आधी सांगितलं
भुजबळ आता म्हणत आहेत, विमान घिरट्या घालत होतं आणि अचानक कोसळलं काहीतरी झालं असावं, यावर बोलताना राऊत म्हणाले, मी वेगळं काय सांगतो आहे, फक्त माझी चूक एवढीच आहे की मी सगळ्यात आधी सांगितलं, आता हळूहळू लोक मानसिक दृष्ट्या स्थिर स्थावर झाल्यावर त्यावर विचार करत आहेत, अजित पवारांनी हा पहिल्यांदाच विमान प्रवास केलेला नाही, चार्टर विमान आणि हेलिकॉप्टर याद्वारे ते प्रवास करत होते, त्यामुळे या सगळ्याचं व्यवस्थापन करणाऱ्या लोकांना पायलट आणि बाकी गोष्टी माहिती असतात.
ऑपरेशन लोटसचा एक भाग असल्याचा दावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केला असून, हा अपघात ‘ऑपरेशन लोटस’चा एक भाग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार जर भाजप आणि महायुती सोडून परत शरद पवारांकडे गेले असते, तर तो भाजपच्या ऑपरेशन लोट्सला मोठा धक्का बसला असता. जो भाजपच्या विरोधात जाईल तो एक तर तुरुंगात जाईल, किंवा त्याचा जीव जाईल,” असे म्हणत संजय राऊत यांनी टीका केली.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहता कोणतीही घटना साधी मानता येत नाही. अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सखोलपणे व्हायला हवा. हा अपघात केवळ तांत्रिक बिघाड आहे की त्यामागे काही राजकीय कट आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे.” त्यांनी थेट ‘ऑपरेशन लोटस’चा उल्लेख करत या घटनेला संशयाच्या भोवऱ्यात आणले.राऊत पुढे म्हणाले की, “सत्तेसाठी कोणत्या थराला जाऊन डावपेच खेळले जात आहेत, हे देशाने पाहिले आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना केवळ योगायोग म्हणून सोडून देता येणार नाही. सरकारने याची निष्पक्ष चौकशी करावी आणि सत्य जनतेसमोर आणावे.”





